(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral video: रेशन कार्डवरील नावात घोळ; पठ्ठ्यानं सरकारी अधिकाऱ्यासमोर चक्क 'भुंकत' दाखवली चूक, व्हिडीओ व्हायरल
एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, ज्याचं रेशन कार्डवरील नाव हे चुकीचं छापलं गेलं आहे.
Viral video: सरकारी कागदपत्रांमध्ये काही त्रुटी अढळल्यानं अनेक वेळा लोक सरकारी कार्यालयाला चकरा मारतात. कागदपत्रांमधील चुका दुरुस्त करण्यासाठी लोक सरकारी अधिकाऱ्यांना विनंती करता तरी देखील त्यांचे काम अनेक वेळा रखडते. काही लोक काम पूर्ण न झाल्यानं आंदोलन, निदर्शन करण्याचा पर्याय निवडतात. सध्या एका अशाच व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, ज्याचं रेशन कार्डवरील नाव हे चुकीचं छापलं गेलं आहे. या व्यक्तीनं अगदी हटक्या पद्धतीनं सराकारी अधिकाऱ्यासमोर त्याची समस्या मांडली.
श्रीकांत दत्ता ऐवजी छापलं गेलं श्रीकांत कुत्ता
पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यातील श्रीकांत कुमार दत्ता यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. श्रीकांत यांच्या रेशन कार्डवर त्यांचं आडनाव हे दत्ता ऐवजी कुत्ता असं छापलं गेलं आहे. श्रीकांत यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती दिली की, रेशन कार्डवर त्यांचं आडनाव हे एक नाही दोन नाही तर तीन वेळा चुकीचं छापलं गेलं आहे.
एकदा श्रीकांत मंडल दुसऱ्यांदा श्रीकांती आणि तिसऱ्या वेळा श्रीकांती कुत्ता असं नाव श्रीकांत यांच्या रेशन कार्डवर छापलं गेलं आहे. या प्रकरणी श्रीकांत यांनी ज्वाइंट बीडीओ (BDO) यांच्यासमोर 'भुंकून' निषेध व्यक्त केला.
पाहा व्हायरल व्हिडीओ:
#WATCH पश्चिम बंगाल: बांकुड़ा में राशन कार्ड में उपनाम के गलत लिखे जाने पर एक व्यक्ति ने सरकारी अधिकारी के सामने 'भौंक' कर विरोध किया गया। प्रदर्शन का वीडियो वायरल हुआ। (19.11) pic.twitter.com/yqKC58NwPg
— ANI_HindiNews (@AHindinews) November 20, 2022
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, श्रीकांत कुमार हे सरकारी अधिकाऱ्याच्या वाहनासमोर भुंकायला लागले. दत्ता यांनी ज्या पद्धतीने विरोध केला, ते पाहून सरकारी अधिकारीही चकित झाले. काही वेळानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत स्थानिक अधिकाऱ्यांना चूक सुधारण्याचे निर्देश दिले.
श्रीकांत कुमार दत्ता यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकरी श्रीकांत याचं कौतुक करत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: