Viral: आई सर्वात मोठी योद्धा! लेकरासाठी एक 'आई' काय करू शकते, 'हा' व्हायरल व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
Viral: सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, एक आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते, हे यातून सिद्ध होतंय, जाणून घ्या सत्य
Viral: आई ही सर्वात मोठी योद्धा असते. ती आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. वेळ पडली तर ती कोणत्याही थराला जाऊ शकते, कारण ती एक आई असते. आईची थोरवी कितीही सांगितली, तितकी ती कमीच आहे. असाच एका आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. ज्याप्रमाणे राणी लक्ष्मीबाई आपल्या लेकराला पाठीशी बांधून इंग्रजांशी लढल्या, त्याच प्रमाणे आजच्या काळातील स्त्री देखील राणी लक्ष्मीबाईचं जणू जीवंत उदाहरणच आहे. एकदा पाहाच..
आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते...
सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ दिसतात, जे आपल्यावर अनेक प्रकारे प्रभावित करतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक आई आपल्या मुलासोबत घरोघरी अन्न पोहोचवताना म्हणजेच फूड डिलीव्हरी करताना दिसत आहे. आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते हे या व्हिडीओने सिद्ध केले आहे. जाणून घ्या..
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
इन्स्टाग्रामवर महिला डिलिव्हरी पार्टनरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ही महिला बाईक चालवत आहे आणि तिच्या समोर तिचा लहान मुलगा बसलेला आहे. हा व्हिडिओ गुजरातच्या राजकोटचा आहे, जो विशाल नावाच्या कंटेंट क्रिएटरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये विशालने सांगितले की, ती महिला रेस्टॉरंटमधून पार्सल उचलते आणि ग्राहकांना देते. विशालने या महिलेला गुजरातमध्ये रस्त्यावर दुचाकी चालवताना पाहिल्यानंतर तो तिच्याशी बोलण्यासाठी गेला. विशालने तिला तिच्या व्यवसायाबद्दल विचारले आणि त्यांचे संभाषण एका व्हिडीमध्ये रेकॉर्ड केले, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इथे शेअर करत आहोत.
View this post on Instagram
एका आईची व्यथा जाणून डोळ्यात येईल पाणी..!
व्हिडिओमध्ये महिलेने सांगितले की ती हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थिनी आहे. लग्नानंतर तिला नोकरी मिळत नव्हती. महिलेने सांगितले की, ती नोकरीच्या शोधात होती जिथे ती तिच्या मुलाला सोबत घेऊन जाऊ शकते. मात्र, या कारणास्तव लोक त्याला नोकरी देत नव्हते. यानंतर ती झोमॅटो डिलिव्हरी एजंट म्हणून काम करू लागली. जेव्हा व्लॉगरने तिला विचारले की तिला तिच्या लहान मुलासह बाईकवर ऑर्डर लोकेशनवर जाण्यात काही अडचण आली का? तेव्हा महिलेने सांगितले की प्रत्येक काम सुरुवातीला करणे कठीण असते. सुरुवातीला हे काम करणं अवघड होतं, पण आता मी डिलिव्हरीची जागा शोधून तिथे जाते. ती पुढे म्हणाली की, जर तुम्हाला काम करायचे असेल तर कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. मनात ठरवलं तर तुम्ही ते करू शकता.
व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केलं कौतुक
या व्हिडिओला इंस्टाग्रामवर 8 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, या व्हिडिओवर कमेंट करून लोकांनी आपल्या मुलाची डिलिव्हरी एजंट म्हणून काम करणाऱ्या या आईचे कौतुक केले आहे. या व्हिडिओला 897,393 लाईक्स आले आहेत.
हेही वाचा>>>
Women Health: गरोदर महिलांच्या 'या' चुकांमुळे बाळाचा चेहरा बिघडू शकतो? गर्भावर होतो परिणाम? अभ्यासात म्हटलंय...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )