Viral: 'मुलांना जन्म द्या..पैसे मिळवा..! 'या' देशाचं लोकसंख्या वाढीसाठी अजब फर्मान, काय आहे आयडियाची कल्पना?
Viral: तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जोडप्यांना एकत्र वेळ घालवता यावा, शारीरिक संबंध ठेवता यावा यासाठी 'हा' देश अनेक प्रयत्न करत आहे.
Viral: जिथे अनेक देशात लोकसंख्या वाढीवर ब्रेक लागावा, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तर दुसरीकडे असा एक देश आहे, जो सध्या त्यांच्या लोकसंख्या वाढीबाबत चिंतेत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या देशातील लोकांना जोडप्यांना एकत्र वेळ घालवता यावा, शारीरिक संबंध ठेवता यावा यासाठी 'हा' देश अनेक प्रयत्न करत आहे. हे सर्व मुलांचा जन्मदर वाढावा यासाठी केले जात आहे.
घटत्या जन्मदराबद्दल 'हा' देश चिंतेत
आम्ही ज्या देशाबद्दल बोलत आहोत. तो देश रशिया आहे. अखेर रशियात असं काय घडलंय की पुतिन सरकार आता रात्री 10 ते पहाटे 2 वाजेपर्यंत इंटरनेट आणि वीज कनेक्शन बंद करण्याचा विचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियामधील घटत्या जन्मदराबद्दल सरकार चिंतेत आहे, याला सामोरे जाण्यासाठी या संदर्भात 'मंत्रालय' तयार करण्याचा विचार केला जात आहे. मिररच्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या एकनिष्ठ आणि रशियन संसदेच्या कौटुंबिक सुरक्षा समितीच्या प्रमुख 68 वर्षींच्या नीना ओस्टानिना अशा मंत्रालयाचे अपग्रेडेशन करत आहेत.
युक्रेनसोबतच्या युद्धामुळे परिस्थिती आणखीनच बिकट
राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी अधिकाऱ्यांना लोकसंख्येतील घट दुरुस्त करण्याचे आवाहन केले होते, त्यानंतर अधिकारी आता त्यावर काम करत आहेत. खरं तर रशियामध्ये आधीच कमी जन्मदर होता, पण युक्रेनसोबत जवळपास तीन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. बातमीनुसार, लोकसंख्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.
रात्री इंटरनेट आणि वीज बंद
रशियात रात्री 10 वाजल्यानंतर पहाटे 2 वाजेपर्यंत इंटरनेट आणि वीज बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जे लोक आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवू शकतात आणि शारिरीक संबंध ठेवू शकतात. त्यामुळे जन्मदर वाढण्यास मदत होईल.
आई होण्यासाठी प्रोत्साहन
महिला जर आई होणार असेल तर तिला सर्व सरकारी सुविधांचा फायदा झाला पाहिजे, असा सल्ला रशिया सरकारने दिला. त्यांना आर्थिक मदत करावी. पेन्शनमध्येही वाढ किंवा लाभ देण्यात यावा असंही सांगण्यात आलंय.
डेटसाठी मिळणार पैसे, लग्नाच्या पहिल्या रात्री हॉटेल बुकिंग
पहिल्यांदा डेटवर जाणाऱ्या लोकांनाही प्रोत्साहन द्यावे, असेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या जोडप्यांना चार हजार रुपयांपेक्षा जास्त मदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. एवढेच नाही तर जर एखाद्या जोडप्याने लग्न केले तर त्यांनी 24 हजार रुपयांपर्यंतचे हॉटेल बुक करण्याची संधी रशिया सरकार देत आहे.
हेही वाचा>>>
Viral: बिअरच्या बाटलीच्या वेगवेगळ्या रंगाचा अर्थ काय? रंगामुळे बदलते चव? सत्य जाणून आश्चर्यचकित व्हाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )