Viral: लग्नात क्षणात गायब होणारी ती 'मिस्ट्री वूमन' कोण? वऱ्हाडी मंडळीही आश्चर्यचकित! लोक म्हणाले- 'ही तर देवी...?'
Viral: सध्या एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये एक महिला वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर पोहोचली, पण क्षणात गायब झाली, जाणून घ्या..
Viral: लग्न म्हणजे नवीन नात्याची सुरूवात.. वधू-वरासाठी हा सर्वात खास आणि महत्वाचा क्षण असतो. लग्नात नवरा-नवरीला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. काही पाहुणे कुटुंबाच्या ओळखीचे असतात तर काही अनोळखी असतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वृद्ध महिला, जिचा चेहरा झाकलेला होता, लग्नात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचली होती खरी..पण त्यानंतर ती अचानक गायब झाली.. कोण होती ती 'मिस्ट्री वूमन'? काय घडलं नेमकं?
महिलेच्या चेहऱ्यावर मास्क... संपूर्ण डोके झाकलेले..व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ज्या स्टेजवर विवाह सोहळा सुरू आहे, एका वृद्ध महिला, जिच्या चेहऱ्यावर मास्क होता आणि तिचे संपूर्ण डोके झाकलेले होते. तिचा चेहरा दिसत नव्हता. मात्र ती लग्नाच्या टिव्ही स्क्रीनकडे पाहून वधूला आशीर्वाद देत होती. स्टेजजवळ स्क्रीनवर दिसणाऱ्या वधू-वरांकडे पाहून वृद्ध महिला त्यांना आशीर्वाद देत जणू जीवन जगण्याचा सोपा मार्ग सांगत होती. घरच्यांनी तिला पाहिल्यानंतर ते तिला वधू-वरांकडे घेऊन गेले. त्या स्टेजवर ही महिला वधू-वरांसह उपस्थित होती. ज्यानंतर वृद्ध महिलेने या जोडप्याला आशीर्वाद देऊन जीवनमंत्रही दिला. यानंतर ती पुन्हा मंचावरून खाली आली आणि पडद्यावर दिसणाऱ्या वधू-वरांना काहीतरी बोलून निघून गेली.
View this post on Instagram
ही महिला कोण होती? ती कुठून आली?
आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, ही महिला कोण होती? ती कुठून आली? वधू-वरांना छान गोष्टी सांगून ती का निघून गेली? हे कोणालाच माहीत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हजारो लोक त्यावर कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ 46 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
यूजर्सच्या भारी कमेंट्स
एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, जेव्हा मी मित्राच्या आईला त्या वृद्ध महिलेकडे जाताना पाहिले, तेव्हा वाटले की, ती त्याला खायला देईल किंवा काहीतरी देईल, पण जेव्हा तिने तिला स्टेजवर नेले तेव्हा माझे हृदय विरघळले. चांगल्या वागण्याबद्दल बाईंचे मनापासून आभार. दुसऱ्याने लिहिले की, हा एक भावनिक व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून माझे अश्रू आवरता आले नाहीत. दुसऱ्याने लिहिले की माणसांसारखे वागणे आपल्याला माणूस बनवते. तर आणखी एका यूजरने लिहिले की, ही एक देवीच असावी, जी वधू-वराला आशीर्वाद द्यायला आली होती.
हेही वाचा>>>
Viral: हद्दच झाली राव..! शॅम्पू समजून महिलेने चक्क नदीतील विषारी फेसाने धुतले केस, व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांचा संताप
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )