Population of Ants on Earth : पृथ्वीवर किती मुंग्या? शास्त्रज्ञांनी मोजली एकूण संख्या, आकडा ऐकाल तर...
Population of Ants on Earth : जर्मनीतील वुर्जबर्ग येथे असलेल्या ज्युलियन मॅक्सिमिलियन्स विद्यापीठात एक संशोधन करण्यात आले, ज्यामध्ये मुंग्यांच्या लोकसंख्येचा अंदाज लावला गेला.
Population of Ants on Earth : पृथ्वीवर (Earth) अनेक सजीव आढळतात. प्राणी, पक्षी, किटक, वनस्पतींच्या अनेक प्रजाती आपल्या आजूबाजूला असतात. सृष्टीची रचना म्हणजे, एक किमया असल्याचं अनेकदा आपण ऐकतो. जीवन, मृत्यू यांच्यात निसर्गही समतोल राखतो. प्रत्येक जीव जन्माला येतो आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. जीवन, मृत्यूमध्ये राखलेल्या समतोलामुळे सर्व सजीवांची लोकसंख्याही संतुलित राहते. पृथ्वीवरील मानवांची लोकसंख्या किती? असा प्रश्न जर कोणी विचारला? तर त्याचं उत्तर देता येतं. कारण जगभरातील प्रत्येक देशात जनगणना केली जाते. सध्या पृथ्वीवर 7.8 अब्ज म्हणजेच, 780 कोटी मानव राहतात. पण तुम्हाला माहीत आहे का? पृथ्वीवर अनेक प्राणी, किटक आहेत, ज्यांची संख्या मानवापेक्षा हजारो पटींनी अधिक आहे. यामध्ये मुंग्यांचाही (population of ants on earth) समावेश आहे. शास्त्रज्ञांनी नुकतंच एक संशोधन केलं असून त्यातून त्यांनी मुंग्यांच्या लोकसंख्येबाबत (ants population) धक्कादायक दावा केला आहे.
डेली स्टार न्यूज वेबसाईटच्या वृत्तानुसार, जर्मनीतील वुर्जबर्ग (Wurzberg, Germany) येथील ज्युलियन मॅक्सिमिलियन्स विद्यापीठात (Julius Maximilians University) एक संशोधन करण्यात आलं. ज्यामध्ये मुंग्यांच्या लोकसंख्येचा (research on ants) अंदाज लावला गेला. वेबसाईटशी बोलताना या संशोधनाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या प्रमुख संशोधक सॅबिन नूटेन (Sabine Nooten) म्हणाल्या की, "आमच्या अंदाजानुसार, या पृथ्वीवर 20 क्वॉड्रिलियन मुंग्या आहेत. इतक्या मुंग्या मोजणं अशक्य आहे."
पृथ्वीवर आहेत इतक्या मुंग्या!
शास्त्रज्ञांच्या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, पृथ्वीवर तब्बल 20 क्वॉड्रिलियन मुंग्या आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, 20 क्वॉड्रिलियन म्हणजे किती? तर 20 क्वॉड्रिलियन म्हणजे, 20 हजार ट्रिलियनपेक्षा जास्त मुंग्या. हे अंकस्वरुपात पाहायचं झालं तर, 20 सोबत 15 शून्य म्हणजे, (20,000,000,000,000,000). ही संख्या इतकी जास्त आहे की, ती वाचणं किंवा मोजणं जवळजवळ अशक्यच. शास्त्रज्ञांनी सांगितलं की, या जीवांची वाढ आणि इतक्या मोठ्या प्रमाणाबाबत जाणून घेणं खूप आवश्यक आहे. कारण यामुळेच मानवाला त्यांचं महत्त्व आणि पर्यावरणाचं चक्र सुरु ठेवण्यासाठी हे जीव बजावत असलेल्या भूमिकांची जाणीव होईल.
मुंग्यांवरील जुन्या संशोधनाच्या आधारे दावा
किटकांवर, विशेषत: मुंग्यांवर त्यांची लोकसंख्या किती आहे? हे जाणून घेण्यासाठी असं संशोधन यापूर्वी झालेलं नाही, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. बऱ्याच काळापासून मुंग्या हा असा प्राणी मानला जातो, ज्यांच्यावर हे जग चालतं. टीमनं आपल्या संशोधनात दिलेला डेटा मुंग्यांवर यापूर्वी केलेल्या सुमारे 489 संशोधनांवर आधारित आहे.