Viral Accident Video: हा तर देवाचा चमत्कार! भीषण रस्ता अपघातातून तो 'असा' वाचला, नेटकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त
Viral Accident Video: सध्या सोशल मीडियावर काही आश्चर्यकारक रस्ते अपघातांचे व्हिडीओ समोर येत आहेत.
Viral Accident Video : देव तारी, त्याला कोण मारी.. ज्याचे रक्षण देव स्वतः करत असेल तर त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. या म्हणीचे प्रत्यंतर एका व्हायरल व्हिडीओमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर काही आश्चर्यकारक रस्ते अपघातांचे व्हिडीओ समोर येत आहेत.
भीषण अपघाताचे व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क
सोशल मीडियावर अलीकडेच रस्त्यावरील भीषण अपघाताचे व्हिडीओ सातत्याने व्हायरल होताना दिसत आहेत. या अपघातात अनेक लोकांना जीव गमवावा लागला. त्याच वेळी, काही लोक गंभीर अपघातानंतरही सुरक्षितपणे वाचताना दिसत आहेत. आणि हे व्हिडीओ पाहून लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
View this post on Instagram
रस्ते अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
व्हायरल होत असलेल्या एका क्लिपमध्ये असेच दृश्य पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये वर्दळीचा रस्ता दिसत आहे. यावेळी एक तेलाचा टँकर रस्त्यावर येताना दिसतो. यावेळी मागून एक दुचाकीस्वारही येतो. जवळच उभ्या असलेल्या कारचा दरवाजा अचानक उघडल्याने दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटते. आणि बाजूने येत असलेल्या टॅंकरच्या खाली जातो. पण..
टँकरखाली आला माणूस... पण...
व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, बाईकवरून पडल्यानंतर दुचाकीस्वार माणूस तेलाच्या टँकरखाली आला खरा... हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या मनाच विचार येईल की, त्या बाईकस्वाराचा चेंदामेंदा झाला असेल. पण हे सत्य नाही. आश्चर्य तर हे आहे की, ऑईल टँकर थांबल्यानंतर अचानक हा दुचाकीस्वार सुखरूप बाहेरही पडतो.
हा तर देवाचा चमत्कार.. व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित
सोशल मीडियावर या रस्ता अपघाताचा व्हिडीओ नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करत आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ अत्यंत वेगाने शेअर होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला सोशल मीडियावर 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर यूजर्स कमेंटही करताना दिसत आहेत, हा व्हिडीओ पाहून लोकं याला देवाचा चमत्कार म्हणत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Viral News : सफाई कर्मचाऱ्याचे नशीब रातोरात बदलले! 50 लाखांची लॉटरी लागली, 25 वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाले
- Bengaluru Flood : बंगळुरूच्या पुरात अडकलेल्यांना लोकांना ट्रॅक्टरचा आधार, CEO गौरव मुंजाल यांचे ट्विट, व्हिडीओ व्हायरल