Video: शिक्षकाच्या 'पतली कमरिया' या भोजपुरी गाण्यावरील डान्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ, नेटकरी म्हणाले, 'मेरा देश बदल रहा है'
Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये शिक्षक भोजपरी गाणे 'पतली कमरीया मोरी' या गाण्यावर शाळेच्या वर्गामध्ये शिक्षक ठुमके लावताना दिसत आहे.
Trending Teacher Dance Video: सोशल मीडियावर (Social Media) रोज लेटेस्ट डान्स आणि रील आहे व्हायरल होत असते. जर तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल तर तुम्हाला व्हायरल डान्स ट्रेंड (Viral Dance Trend) पाहायला मिळेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या अनेक लोकांचं निरनिराळं टॅलेंट (Talent) पाहायला मिळते. अगदी लहान मुलापासून वृद्ध व्यक्तींपर्यंत अनेकांचे निरनिराळे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसोबत डान्स (Dance Video of Teacher) करताना दिसतात.
सोशल मीडियावर वर्गातील शिक्षकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये शिक्षक भोजपरी गाणे 'पतली कमरीया मोरी' या गाण्यावर शाळेच्या वर्गामध्ये शिक्षक ठुमके लावताना दिसत आहे. तसेच बरोबर विद्यार्थी देखील शिक्षकाला चिअर्स करताना दिसत आहे. आता व्हिडीओमधील व्यक्ती की ही खरीच शिक्षक आहे का? तर अद्याप याबाबत कोणती माहिती आलेली नाही. परंतु ती व्यक्ती शिक्षक असल्याचा अंदाज नेटकऱ्यांकडून लावण्यात आला आहे.
mera desh badal raha hai, aage badh raha hai 👍🏻 pic.twitter.com/LDK4NtaLvr
— . (@stormiismykid) December 26, 2022
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. शिक्षकच (School Teachers) असं वागत असतील तर ते विद्यार्थ्यांना काय शिकवणार असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.. याचा व्हिडीओही वर्गात शूट केला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. . व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की आपल्या शिक्षकाला डान्स करताना पाहून तिथे उपस्थित विद्यार्थीही थिरकू लागतात.
हा व्हिडीओ ट्विटर यूजर stormiismykid ने शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 87 हजारापेक्षा अधिक व्यक्तींनी पाहिला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर काहींनी नाराजी व्यक्त केली. तर काही यूजर्सने कौतुक केले आहे. . तर एका ट्विटर युजरने म्हटलं, मेरा देश बदल रहा है... अन्य एक नेटकरी म्हणाला, ही आमची नवी शिक्षण व्यवस्था. तर हे मजेशीर नसून गंभीर आहे. असंही एकाने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे
संबंधित बातम्या: