(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wedding After Death : मृत्यूच्या 30 वर्षांनंतरही थाटामाटात 'लग्न'! कर्नाटक-केरळच्या भागात आजही 'ही' प्रथा कायम
Wedding After Death : सध्या देशाच्या काही भागात मृत्यूनंतर लग्न करण्याचा विधी आजही प्रचलित आहे. कर्नाटक आणि केरळच्या काही भागात 'प्रेथा कल्याणम' नावाची परंपरा अजूनही चालते.
Wedding After Death : आपल्या देशात लग्नाला खूप पवित्र मानले जाते. विवाहादरम्यान दोन व्यक्ती तसेच दोन कुटुंब एकत्र येतात. बहुतेक ठिकाणी, लग्नाच्या वेळी आपली प्रथा आणि परंपरेनुसार वधू-वरांना (bride groom)पवित्र सूत्रात बांधले जाते. सध्या देशाच्या काही भागात मृत्यूनंतर लग्न करण्याचा विधी आजही प्रचलित आहे.
काय आहे 'प्रेथा कल्याणम' प्रथा?
रिपोर्टनुसार, कर्नाटक आणि केरळच्या काही भागात 'प्रेथा कल्याणम' (Pretha Kalayanam) नावाची परंपरा अजूनही पाळली जाते. या परंपरेनुसार, जन्माच्या वेळी मृत्यू आलेल्यांसाठी विवाह विधी आयोजित केले जातात. या राज्यांमध्ये राहणारे समाजातील लोक याला त्यांच्या आत्म्याचा सन्मान करणे म्हणतात.
..its a serious tradition here. For those who died in child birth, they are usually married off to another child who is deceased during the child birth. All the customs happen just like any marriage. Two families will go to each other's house for the engagement(contd)
— AnnyArun (@anny_arun) July 28, 2022
मृत्यूनंतर 30 वर्षांनी विवाह
यूट्यूबर अॅनी अरुणने ट्विटरवर या अनोख्या लग्नाची माहिती शेअर केली आहे. त्यानुसार कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात शोभा आणि चंदप्पा यांचा मृत्यूच्या 30 वर्षांनंतर पारंपरिक पद्धतीने विवाह झाला. जे आश्चर्यचकित करणारे आहे, या लग्नादरम्यान केलेले विधी पूर्णपणे कोणत्याही सामान्य लग्नासारखे होते.
I reached a bit late and missed the procession. Marriage function already started. First groom brings the 'Dhare Saree' which should be worn by the bride. They also give enough time for the bride to get dressed! pic.twitter.com/KqHuKhmqnj
— AnnyArun (@anny_arun) July 28, 2022
वधू-वरांऐवजी पुतळा वापरला
यावरून हे स्पष्ट होते की 'प्रेथा कल्याणम' हा एक प्रकारचा 'मृतांचा विवाह' होता. ज्यामध्ये वधू-वरांचा जन्माच्या वेळीच मृत्यू झाला होता. त्याच वेळी, त्यांच्या मृत्यूच्या 30 वर्षांनंतर, आता त्यांचा विवाह सोहळा पार पडला. YouTuber अॅनी अरुण यांनी सांगितले की, हे लग्न कोणत्याही नियमित लग्नाप्रमाणेच औपचारिक होते. फरक एवढाच होता की प्रत्यक्ष वधू-वरांऐवजी त्यांचे पुतळे वापरण्यात आले होते.
Bride and groom do the 'Saptapadhi' 7 rounds before sit for the marriage. pic.twitter.com/IMnSEb4rio
— AnnyArun (@anny_arun) July 28, 2022
हेही वाचा:
- Thailand Viral Video : हॉटेलच्या खोलीत निवांत झोपली होती महिला, तितक्यात खिडकीत आला हत्ती, अन्...
- Trending Video : आपापसातच भिडले 5-6 सिंह, कोणी मारली बाजी? चित्तथरारक झुंजीचा व्हिडीओ व्हायरल