एक्स्प्लोर

Aliens on Earth : काय सांगता? डिसेंबरमध्ये पृथ्वीवर अवतरणार एलियन, टाईम ट्रॅव्हलरच्या दाव्यानं सारेच हैराण

Aliens Would Land on Earth : एनो अलारिक (Eno Alaric) नावाच्या व्यक्तीने आपण टाईम ट्रॅव्हलर (Time Traveller) असल्याचा दावा करत पृथ्वीवर एलियन अवतरणार असल्याचाही दावा केला आहे.

Aliens on Earth : आपल्या सर्वांना अभिनेता ऋतिक रोशनचा (Hrithik Roshan) 'कोई मिल मिल गया' चित्रपट पाहिला असेल. ज्यामध्ये युएफओमधून (UFO) एक एलियन (Alien) पृथ्वीवर उतरला होता. खरंच एलियन पृथ्वीवर (Earth) उतरला तर... एलियनबाबत आपण अनेक चर्चा ऐकल्या आहेत. लहानपणापासून प्रत्येकाने एलियन आणि युएफओ हे शब्द एकदा तरी नक्कीच ऐकले असतील. कधी कुठे युएफो म्हणजे उडत्या तबकड्या दिसल्याच्या चर्चाही ऐकायला मिळतात. दरम्यान, आता एलियन पृथ्वीवर अवतरणार असल्याची चर्चा आहे. एका स्वयंघोषित टाईम ट्रॅव्हलरने पृथ्वीवर एलियन येणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सर्वच जण हैराण झाले आहेत.

डिसेंबरमध्ये पृथ्वीवर अवतरणार एलियन

एनो अलारिकच्या (Eno Alaric) व्यक्तीने आपण टाईम ट्रॅव्हलर (Time Traveller) असल्याचा दावा केला आहे. या स्वयंघोषित टाईम ट्रॅव्हलरने दावा केला आहे की, डिसेंबर महिन्यात पृथ्वीवर एलियन अवतरणार आहे. एनो अलारिक आपण टाईम ट्रॅव्हलर असल्याचा दावा करत टिक-टॉकवर (Tik Tok) काही भविष्यवाण्या केल्या आहेत. यामधील एक म्हणजे डिसेंबर महिन्यात पृथ्वीवर एलियन येणार असल्याचं, त्यानं म्हटलं आहे. त्यानं म्हटलं आहे की, डिसेंबर महिन्यात एलियन पृथ्वीवर येऊन मानवासोबत संवाद साधेल. त्यांच्या दाव्यानुसार, 8 डिसेंबरला एलियन्स एका विशाल युएफओमधून पृथ्वीवर उतरतील.

Aliens on Earth : काय सांगता? डिसेंबरमध्ये पृथ्वीवर अवतरणार एलियन, टाईम ट्रॅव्हलरच्या दाव्यानं सारेच हैराण

मार्चमध्ये दिसणार मोठा उल्का वर्षाव (Meteror Garden in March)

याशिवाय, त्याने दुसरा दावा केला आहे की, मार्च 2023 मध्ये मोठा उल्का वर्षाव होईल. एनो अलारिकच्या दाव्यानुसार मार्च 2023 मध्ये अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर 750 फूट परिसरात मोठा उल्का वर्षाव (Meteror Garden) होईल, असा अंदाजही त्याने वर्तवला आहे.

टाईम ट्रॅव्हलर किंवा टाईम ट्रॅव्हलिंग म्हणजे काय? (Time Traveller)

टाईम ट्रॅव्हलर म्हणजे वर्तमानातून भूतकाळात किंवा भविष्यकाळात प्रवास करणे. तुम्ही हॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये टाईम ट्रॅव्हलिंग पाहिलं असेल. एखादी टाईम मशीन असते. ज्यामध्ये हिरो किंवा हिरोईन भूतकाळात किंवा भविष्यकाळात प्रवास करून घडलेल्या किंवा घडणाऱ्या घटनांबद्दल माहिती देतात. किंवा काही चित्रपटात अभिनेता किंवा अभिनेत्रीकडे भूतकाळ किंवा भविष्यात प्रवास करण्याची शक्ती असते. टाईम मशीन, टाईम ट्रॅव्हलर, टाईम ट्रॅव्हलिंग या काल्पनिक संकल्पना आहेत. विज्ञान टाईम ट्रॅव्हलिंग या संकल्पनेला मानतं नाही, कारण तसे पुरावे नाहीत. 

खरंच एलियन आहे का?

एलियनबाबक अनेक तर्क-वितर्क केले जातात. शास्त्रज्ञांकडूनही यावर संशोधन सुरु आहे. पण एलियनच्या अस्तित्वाबाबत अद्याप कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. मात्र अनेक वेळा एलियनबाबत चर्चा ऐकण्यात येतात. कुठे युएफओ म्हणजे उडत्या तबकड्या किंवा एखादी संशयास्पद गोष्ट अवकाशात उडतानाच कानावर येतं. अर्थात याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे एलियन खरंच पृथ्वीवर उतरणार का हे पाहावं लागेल.

UFO म्हणजे काय?

UFO अर्थात Unidentified Flying Object म्हणजे अज्ञात उडणारी वस्तू. याचाच अर्थ असा की, हवेत उडणारी अज्ञात वस्तू ज्याची कोणतीही ओळख नाही. याला उडत्या तबकड्या असंही म्हणतात. याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही. अनेक वेळा UFO दिसल्याचे दावे करण्यात येतात. त्यामुळे शास्त्रज्ञांकडून याबाबत अधिक संशोधन सुरु आहे. 

अनेक लोकांच्या दाव्यानुसार, UFO एलियनच्या जगातून येतात. UFO म्हणजे उडत्या तबकड्या हे एलियन्सच्या प्रवासाचं साधन असल्याचा दावा करण्यात येतो. एलियन्स युएफओमधून एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जातात, असा दावा करण्यात येतो. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

शास्त्रज्ञांच्या मते, अद्याप एलियन्स किंवा युएफओबाबत कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. मात्र, ब्रह्मांड इतकं मोठं आहे की, त्याची आपण कल्पनाही करु शकतं नाही. यामुळे अवकाशात कोणत्या कोपऱ्यात काय गुपित लपलं असेल, ठाऊक नाही. त्यामुळे याची शक्यता नाकारता येत नाही.

टीप : एबीपी माझा या बातमीतून कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. ही माहिती केवळ मनोरंजन म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget