Stone Fry Dish : आता हे काय नवीन? लोक दगडंही खातात चोखून, 'स्टोन फ्राय'साठी मोजावी लागेल मोठी किंमत
Suodiu Chinese Dish : स्टोन फ्राय डिश चीनमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. चीनमध्ये या डिशला सुओडीयू असं म्हणतात. हा चीनमधील पारंपारिक पदार्थ असून त्याचे आरोग्यसाठी खूप फायदे आहेत.
मुंबई : जगभरात जितके देश आहेत, तितकेच तेथील खाद्यपदार्थांमध्येही (Dish) विविधता आढळते. प्रत्येक देशांमध्ये तेथील काही खास खाद्यपदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत. काही देशातील लोक साप, विंचू, बेडूक आणि इतर कीटकही खातात, हे तुम्ही ऐकले असेल. पण चीनमधील लोक तर विविध प्राणी आणि कीटकांसह दगडही चोखून खातात. हो तुम्ही वाचताय ते अगदी खरं आहे. स्टोन फ्राय हा चीनमधील अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे.
'हे' लोक दगडंही चोखून खातात
आशियातील सर्वात मोठा आणि भारताचा शेजारील देश चीनमधील लोक दगड चोखण्यासाठीही मोठी किंमत मोजतात. चीनी लोक दगड चोखून खातात. चीनमधील लोक अतिशय आवडीने दगड चोखून खातात. हा पदार्थ संपूर्ण चीनमध्ये खूप लोकप्रिय आहे. हा चीनमधील पारंपारिक पदार्थ असून खास कार्यक्रमांमध्ये या पारंपारिक डिशचा बेत असतो.
या डिशचं नाव काय आहे?
चीनमध्ये या खाद्यपदार्थाला सुओडीयू असं म्हणतात. स्टोन फ्राय म्हणजेच सुओडीयू हा पदार्थ ही चीनची पारंपारिक डिश आहे. याचे अनेक वैद्यकीय फायदे देखील आहेत. या स्टोन फ्राय डिशसाठी मोठी किंमतही मोजावी लागते, ती ऐकूनही तुम्ही चकित व्हाल. फक्त दगड चोखण्यासाठी स्टोन फ्राय डिशसाठी सुमारे 200 रुपये मोजावे लागतात. या स्टोन फ्रायच्या एका प्लेटमध्ये सुमारे 22 ते 25 दगड असतात. हे दगड चोखून त्यानंतर ते तुम्ही घरीही नेऊ शकता किंवा त्यापासून पुन्हा स्टोन फ्राय देखील तयार करु शकता.
सुओडीयू पदार्थ नेमका आला कुठून?
सुओडीयू हा पदार्थ चीनच्या हुबेई प्रांतातून आला आहे. पूर्वीच्या काळी चिनी मच्छीमार किंवा व्यावसायिक समुद्रात लांबच्या प्रवासावर जात असत, तेव्हा वाटेत अनेकवेळा अन्नाचा तुटवडा असायचा. त्या परिस्थितीत हे लोक हे दगड विविध मसाल्यांमध्ये तळून चोखत असतं. त्यामुळे चवही चांगली लागायची आणि पोटही भरलं जायचं.
View this post on Instagram
ही डिश कशी बनवली जाते?
सुओडीयू बनवण्यासाठी सर्वात आधी नदीतून विशिष्ट प्रकारचे गुळगुळीत दगड आणले जातात. हे दगड काळ्या रंगाचे असतात. यानंतर हे दगड चांगले स्वच्छ केले जातात. त्यानंतर हे दगड तेल, मसाले, सॉस, काळी मिरी आणि काही इतर मसाले घालून तळले जातात. यासोबत सूप (Soup) ही असतं. दगड चोखून झाल्यावर ते तुम्ही टाकून देऊ शकता किंवा पुन्हाही वापरु शकता.
इतर बातम्या :