(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : विमानात जय महाराष्ट्र! मराठीतील उद्घोषणेमुळे प्रवाशांना सुखद धक्का
Viral Video : स्पाईस जेट या विमानाची सह विमानचालिका संजना अमृते हिने इंग्रजी ऐवजी मराठीमध्ये उद्घोषणा केली.
मुंबई : स्पाईस जेट (Spice Jet) या एअरलाईन्सच्या (Airlines) पुणे ते गोवा या विमानातील प्रवाशांना एक सुखद धक्का मिळाला. दरवेळी इंग्रजीमध्ये होणारी उद्घोषणी ही या विमानातील प्रवशांना चक्क मराठीत ऐकायला मिळाली. या विमानातील सह विमाचालिका संजना अमृते हिने ही मराठीतील उद्घोषणा केली. त्याचप्रमाणे तिने तीच्या उद्घोषणेचा शेवट हा प्रवाशांना 'जय महाराष्ट्र' करत केला. विमानातील प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी, त्यांच्या प्रवासाविषयी माहिती देण्यासाठी विमान चालकांकडून मराठीमधून उद्घोषणा करण्यात येते. सर्वसाधारणपणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानामध्ये ही उद्घोषणा इंग्रजीमधून केली जाते. पण संजना हिने हीच घोषणा मराठीत करुन विमान प्रवाशांची मने जिंकली.
अशी केली उद्घोषणेची सुरुवात
सुरुवातीला संजानाने इंग्रजी भाषेमध्येच तिच्या उद्घोषणेला सुरुवात केली. तिने तिच्या या उद्घोषणेमध्ये सुरुवातील तिने तिची ओळख करुन दिली. पुढे बोलतांना तिने म्हटलं की, नमस्कार मी संजना अमृते. तुमचा प्रवास आणखी चांगला करण्यासाठी मी आता एक वेगळी गोष्ट करणार आहे. यापुढील उद्घोषणी ही मी मराठीतून करणार आहे कारण मी एक मराठी मुलगी आहे. तिच्य या उद्घोषणेमुळे विमानातील प्रवाशांना एक सुखद मिळाला. तसेच तिच्या या सुत्य उपक्रमामुळे प्रवाशांना देखील आनंद झाला.
आणि विमानात सुरु झाली मराठीतून उद्घोषणा...
संजनाने त्यानंतर सर्वांना नमस्कार करत तिच्या मराठीतील उद्घोषणेला सुरुवात केली. यावेळी तिने बोलतांना म्हटलं की, बंधू आणि भगिनींनो तुमचं स्पाईस जेटच्या पुणे ते गोवा या विमानसेवेत खूप स्वागत आहे. त्यानंतर तिने विमानाच्या मुख्य विमानचालकाची आणि इतर कर्मचाऱ्यांची ओळख प्रवाशांना करुन दिली. तसेच या प्रवासात विमानातील कर्मचारी प्रवाशांची योग्य काळजी घेतील अशी आशा देखील तिने यावेळी व्यक्त केली. त्यानंतर तिने विमान प्रवासाविषयी माहिती दिली. तर स्पाईस जेटची निवड केल्याबजद्दल तिने प्रवाशांचे आभार देखील मानले. तिने तिच्या उद्घोषणेचा शेवट हा जय हिंद आणि जय महाराष्ट्र म्हणत केल्या. तिची उद्घोषणा पूर्ण झाल्यानंतर विमानात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
View this post on Instagram
संजना अमृते हिचं शालेय शिक्षण गिरगांवातील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल या शाळेमध्ये झाले आहे. त्यामुळे आपल्या मराठीचे संस्कार तिने अवकाशात झेप घेताना देखील जोपासल्याचं पाहायला मिळत आहे. मराठीमधील उद्घोषणेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर त्यावर अनेकांना कौतुकाचा वर्षावर देखील केलाय.