Trending : शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना खास सरप्राइज; गिफ्ट पाहून विद्यार्थी झाले खुश
शाळेतील शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या शिक्षिकेनं तिच्या वर्गातील विद्यार्थांना खास गिफ्ट दिलं आहे.
Trending : शिक्षक (Teacher) हा विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्वाचा व्यक्ती असतो. शिक्षकांनी दिलेली शिकवण अनेक विद्यार्थी आयुष्यभर लक्षात ठेवतात. अभ्यासासोबतच विद्यार्थांच्या इतर समस्याही समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न अनेक शिक्षक करत असतात. सध्या एका शाळेतील शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या शिक्षिकेनं तिच्या वर्गातील विद्यार्थांना खास गिफ्ट दिलं आहे.
इंस्टाग्रामवर या शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ही शिक्षिका तिच्या वर्गातील विद्यार्थांना स्नीकर्स म्हणजेच शूज गिफ्ट म्हणून देताना दिसत आहे. शिक्षिकेचे हे खास गिफ्ट पाहून वर्गातील सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित होतात.
त्या शिक्षिकेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिनं लिहिलं, 'माझे विद्यार्थी विविध क्षेत्रांतून आलेले आहेत आणि काहींकडे शूज नसतात. जो व्यक्ती शूज घालतो, तो त्या शूजला खास बनवतो असं “लाइक माईक” यांचे वाक्य आहे. या वाक्याचा माझ्यावर खरोखर परिणाम झाला.'
goodnews movement या सोशल मीडिया अकऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, 'विद्यार्थ्यांचा पुढील प्रवास आरामदायक असावा आणि त्यांना आत्मविश्वास वाटावा अशी इच्छा या शिक्षिकेची होती. त्यामुळे तिने प्रत्येक विद्यार्थ्यांना शूज देण्यासाठी पुरेसा निधी गोळा केला. विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वतःचे शूज डिझाइन केले आहेत. या किती छान शिक्षिका आहेत.' काही कंपन्यांनी हे शूज तयार करण्यासाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी शिक्षिकेची मदत केली तर एका कंपनीनं हे शूज तयार केले आहेत.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती
हा व्हायरल व्हिडीओ आत्तापर्यंत दोन मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी या व्हिडीओला कमेंट करुन त्या शिक्षिकेचं कौतुक केलं आहे. एका युझरनं कमेंट केली, ' ही शिक्षिका त्या विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहिल'.
हेही वाचा:
- Thailand Viral Video : हॉटेलच्या खोलीत निवांत झोपली होती महिला, तितक्यात खिडकीत आला हत्ती, अन्...
- Trending Video : आपापसातच भिडले 5-6 सिंह, कोणी मारली बाजी? चित्तथरारक झुंजीचा व्हिडीओ व्हायरल