Viral Video : रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत होता मुलगा, नेटकरी करतायत सलाम, कारण ऐकून व्हाल थक्क
Viral Video : चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Viral Video : चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी रविवारी संध्याकाळी सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, जबाबदारी आणि स्वप्नांचा समतोल राखून पळून जाणारा एक 19 वर्षांचा मुलगा पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच स्मित हास्य असेल. विनोद कापरी रात्री कारमधून जात असताना त्यांची नजर खांद्यावर बॅग घेऊन भरधाव वेगाने धावणाऱ्या मुलावर पडली. कपरी यांनी मुलाला कारने लिफ्ट देण्याची ऑफर दिली, परंतु वारंवार विनंती करूनही त्या मुलाने ते मान्य केले नाही.
एक 19 वर्षांचा मुलगा रात्री 12 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. धावत असताना कापरी या मुलासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला कळले की, त्या मुलाचे नाव प्रदीप मेहरा (Pradeep Mehra) असून तो मॅकडोनाल्डमध्ये काम करतो. प्रदीप सांगतो की, त्याला सैन्यात भरती व्हायचे आहे, त्यामुळे तो शिफ्ट झाल्यावर रोज घरी जाताना धावतो. आपल्या स्वप्नांसाठी धावणारा प्रदीप हा उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने सांगितले की तो नोएडामध्ये त्याच्या भावासोबत राहतो आणि त्याची आई रुग्णालयात आहे.
This is PURE GOLD❤️❤️
— Vinod Kapri (@vinodkapri) March 20, 2022
नोएडा की सड़क पर कल रात 12 बजे मुझे ये लड़का कंधे पर बैग टांगें बहुत तेज़ दौड़ता नज़र आया
मैंने सोचा
किसी परेशानी में होगा , लिफ़्ट देनी चाहिए
बार बार लिफ़्ट का ऑफ़र किया पर इसने मना कर दिया
वजह सुनेंगे तो आपको इस बच्चे से प्यार हो जाएगा ❤️😊 pic.twitter.com/kjBcLS5CQu
व्हिडीओ व्हायरल करण्यावर काय म्हणाला मुलगा?
विनोद कापरी यांनी मुलाला हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणार असल्याचे आणि हा व्हिडीओ लवकरच व्हायरल होणार असल्याचे सांगितले. यावर प्रदीप हसतो आणि म्हणतो मला कोण ओळखेल. पुढे तो म्हणाला की, व्हिडीओ व्हायरल झाला तरी काय होणार आहे कारण मी चुकीचे काही करत नाहीय. व्हिडीओच्या शेवटी, कपरीने प्रदीपला स्वतःसोबत जेवण करण्याची ऑफर देखील दिली, ज्यावर त्याने सांगितले की जर त्याने घरी पोहोचण्यास उशीर केला तर तो स्वयंपाक करू शकणार नाही आणि त्याचा भाऊ उपाशी राहील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Shivjayanti 2022 : अमित ठाकरेंच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावर अभिषेक आणि पूजन, राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह
- RRR : राम चरण आणि ज्युनियर एनटीआरने आमिर खानला शिकवला डान्स, 'नाटू नाटू' गाण्याचा व्हिडीओ व्हायरल
- Hair Care Tips : 'या' कारणांमुळे सुरू होते केस गळणे, चुकूनही दुर्लक्ष करू नका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha