Baramati Nagar Parishad Election: अखेर सस्पेन्स संपला! बारामती नगराध्यक्ष पदासाठी अजितदादांनी उमेदवारी देताच भाजपकडूनही उमेदवाराची घोषणा; महाविकास आघाडीचं अजूनही ठरंना
अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा सस्पेन्स ठेवण्यात आला होता. आता तो दूर झाला असून सचिन सातव हे बारामती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

Baramati Nagar Parishad Election: बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सचिन सातव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सचिन सातव यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळाच्या चिन्हावर देण्यात आली आहे. अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा सस्पेन्स ठेवण्यात आला होता. आता तो दूर झाला असून सचिन सातव हे बारामती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. शिवाय यापूर्वी सचिन सातव हे बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक देखील राहिले आहेत.
भाजपकडूनही उमेदवार जाहीर (Baramati Nagar Parishad Election)
दरम्यान, बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीमधून नगरअध्यक्षपदासाठी गोविंद देवकाते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजप बारामती नगरपरिषद निवडणुकीत 30 जागा लढवणार आहे. भाजपने गोविंद देवकाते यांना उमेदवारी देऊन ओबीसी चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.
महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही गुलदस्त्यात
दरम्यान, बारामतीमध्ये अजित पवारांनी सर्व उमेदवार जाहीर केले असले, तरी महाविकास आघाडीकडून अजून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नगराध्यक्षपदाचा उमेदवार उजूनही गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे बसपाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. काळूराम चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीची उमेदवार यादी (Baramati Nagar Parishad Election)
नगराध्यक्षपद : सचिन सदाशिव सातव
प्रभाग क्र. १ : मनिषा समीर चव्हाण, अविनाश निकाळजे
प्रभाग क्र. २ : जय पाटील, अनुप्रिता डांगे
प्रभाग क्र. ३ : प्रविण दत्तू माने, रुपाली नवनाथ मलगुंडे
प्रभाग क्र. ४ : विष्णुपंत चौधर, संपदा चौधर
प्रभाग क्र. ५ : किशोर आपणासाहेब मासाळ, ऋतुजा प्रताप पांगळे
प्रभाग क्र. ६ : अभिजीत जाधव, धनश्री अविनाश बांदल
प्रभाग क्र. ७ : प्रसाद खारतुड, भारती विश्वास शेलके
प्रभाग क्र. ८ : अमर घुमाळ, श्वेता योगेश नाटे
प्रभाग क्र. ९ : विशाल भानुदास हिंगणे, पूनम ज्योतिबा चव्हाण
प्रभाग क्र. १० : जयसिंग देशमुख, अनिता गायकवाड,
प्रभाग क्र. ११ : संजय संधवी, सविता जाधव,
प्रभाग क्र. १२ : अभिजीत चव्हाण, सारिका अमोल वाघमारे
प्रभाग क्र. १३ : बिरू भाऊसाहेब मांदरे, सुनीता अरविंद बगाडे
प्रभाग क्र. १४ : नवनाथ बल्लाळ, आप्पा अहीवळे
प्रभाग क्र. १५ : जितेंद्र बाबनराव गुजर, मंगल जयरकश किरवे
प्रभाग क्र. १६ : मंगल शिवाजीराव जगताप, गौरख पारसे
प्रभाग क्र. १७ : अल्ताफ सय्यद, शमीला शिवाजीराव ढवाण
प्रभाग क्र. १८ : राजेंद्र सोनवणे, अखिनी सूरज सातव
प्रभाग क्र. १९ : सुनील दादासाहेब सरसे, प्रतिभा विजय खारत
प्रभाग क्र. २० : प्रथमेश प्रविण गालिंदे, दर्शना विक्रांत तांबे, फरहीन फिरोज बागवान
इतर महत्वाच्या बातम्या























