एक्स्प्लोर

शरद पवारांच्या नेत्याची पत्नी ऐनवेळी शिवसेनेत, तर भाजप समर्थकांना शिंदे गटातून उमेदवारी; बार्शीत असं फिरलं राजकारण

बार्शी नगरपालिका ही अ वर्गातील सर्वात मोठी नगरपालिका असून 42 सदस्य आणि 21 प्रभाग असलेल्या या निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता.

मुंबई/सोलापूर: राजकारणात कोणीही कोणाचा शेवटपर्यंत शत्रू नसतो, याची प्रचिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुंषगाने राज्यभर येत आहे. कुठे दोन्ही राष्ट्रवादी (NCP) एकत्र येत आहेत. कुठे महायुतीमधील भाजप-शिवसेनेत स्वबळाचे दंड थोपटले गेले आहेत. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदासाठी चाकणमध्ये दोन शिवसेना एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. तर, सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचं (Barshi) राजकारणही असंच 360 अंशात झटक्यात बदलल्याचं पाहायला मिळालं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या विश्वास बारबोले यांच्या पत्नीने ऐनवेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, बार्शीत आता कमळ विरुद्ध मशाल अशी थेट लढत होत आहे. दरम्यान, बार्शीचे नगराध्यपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने इच्छुक पुरुष उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे. 

नगरपालिका निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत, नेत्यांच्या नाहीत. त्यामुळे, जिल्हास्तरावर या निवडणुकांसाठीचे निर्णय होतात असे भाजप नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. तर, नगरपालिका निवडणुकासांठी स्थानिक नेत्यांना सर्वाधिकार दिल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं. बार्शी नगरपालिका ही अ वर्गातील सर्वात मोठी नगरपालिका असून 42 सदस्य आणि 21 प्रभाग असलेल्या या निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानुसार, येथील पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या माजी मंत्री तथा आमदार दिलीप सोपल आणि भाजप नेते माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यातच थेट सामना असल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीचा विचार केल्यास येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या सोपल गटास पाठिंबा दिलाय, त्यामुळे बार्शीत दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या. तर, काँग्रेसने स्वतंत्रपणे 12 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवत मतविभाजनासाठी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. नगराध्यक्षपदासाठी येथे भाजपकडून तेजस्विनी कथले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. त्यानंतर, आज शिवसेना ठाकरे गटाकडून निर्मला बारबोले यांनी शेवटच्यादिवशी उमदेवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे त्यांचे पती विश्वास बारबोले हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बार्शीतील नेते आहेत. मात्र, उमेदवारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आमदार सोपल गटाकडून थेट मशाल चिन्हावर आपली उमेदवारी दाखल केली. त्यामुळे, कमळ विरुद्ध मशाल अशीच बार्शीची लढत पाहायला मिळेल. 

राऊत गटातील 6 भाजप समर्थकांना शिवसेनेतून उमेदवारी

नगरपालिकेच्या 42 जागांसाठी सोपल गटातून शिवसेना चिन्हावर 42 उमेदवार उभे करण्यात आले आहेत. तर, भाजप नेते राजेंद्र राऊत यांनी महायुतीचा धर्म पाळत शिंदेंच्या शिवसेनेला 6 जागा दिल्या आहेत. त्यामुळे, 36 जागांवर भाजपच्या कमळ चिन्हावर उमेदवार उभे असतील. मात्र, शिवसेना शिंदेंच्या धनुष्यबाण चिन्हावर उभे राहणारे सहाही उमेदवार हे राजेंद्र राऊत यांचेच समर्थक आणि नगरसेवक आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडीच्या सोपल गटात आणि महायुतीच्या राऊत गटातही तडजोडीचं राजकारण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, काही प्रभागांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिलीप सोपल यांचा प्रचार करणारे नगरपालिकेत सोपल गटाविरोधातील उमेदवार आहेत. 

हेही वाचा

बालबुद्धी म्हणत आदित्य ठाकरेंवर टीका, उद्धव ठाकरेंनाही डिवचलं; अमित साटमांनी मुंबईचं व्हिजन सांगितलं

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manrega Name Change : मनरेगा, 'जी राम जी' मध्ये फरक काय? विरोधकांचा गदारोळ Special Report
Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Embed widget