Remote Kissing Device: ऐकावं ते नवलंच... बाजारात आलं अनोखं Kissing Device, दूर बसलेल्या पार्टनरला करता येणार किस
Remote Kissing Device : या किसिंग डिव्हाईसमध्ये सिलिकॉनपासून तयार केलेले ओठ आहेत. यामध्ये एक सेन्सरही बसवण्यात आला आहे, ज्यामुळे किस करताना ओठांना खरोखर किस करत असल्यासारखे वाटेल.
China Remote Kissing Device : चीन (China) विचित्र संशोधनासाठी ओळखला जातो. सध्या चीनचं असंच एक नवीन संशोधन चर्चेचा विषय ठरला आहे. चीननं आता नवीन किसिंग डिव्हाईस (Remote Kissing Device) तयार केलं आहे. चीनमधील एका विद्यार्थ्याने दूर असणाऱ्या जोडप्यांसाठी विचित्र आणि अनोखं डिव्हाईस तयार केलं आहे. हे डिव्हाईस बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने दावा केला आहे की, या रिमोट किसिंग डिव्हाईसमुळे तुम्ही खरोखरं तुमच्या पार्टनरला किस करत आहात, असा अनुभव येईल.
सातासमुद्रापार बसलेल्या पार्टनरलाही करता येणार किस
चीनमध्ये सध्या हे किसिंग डिव्हाईस खूप चर्चेत आहे. चीनच्या एका युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञाने एकमेकांपासून दूर राहणाऱ्या जोडप्यांसाठी किस करणारं उपकरण तयार केलं आहे. या किसिंग डिव्हाईसमधून तुम्हांला सातासमुद्रापार बसलेल्या तुमच्या पार्टनरला किस करता येणार आहे. हे डिव्हाईस तुम्हाला सेन्सेशन आणि हालचालीद्वारे तुमच्या पार्टनरची प्रेमाची भावना तुमच्यापर्यंत पोहोचवेल. या उपकरणाच्या माध्यमातून तुम्ही दूर बसलेल्या तुमच्या जोडीदाराला किस करण्याचा अनुभव घेऊ शकता.
बाजारात आलं अनोखं Kissing Device
चीनमधील जियांग झोंगली या शास्त्रज्ञाने हे रिमोट किसिंग डिव्हाईस तयार केलं आहे. जियांग झोंगली जो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लाँग डिसटेन्स रिलेशनशिपमध्ये होता. एकमेकांपासून दूर राहिल्यामुळे भेटणं कठीण होत होतं. त्याला प्रेयसीसोबत फक्त फोनवरच बोलता येत होतं. म्हणून त्याने हे डिव्हाईस तयार केलं
खरोखरं किस करत असल्याचा अनुभव
ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या किसिंग डिव्हाईसचे ओठ सिलिकॉनचे बनलेले आहेत. यामध्ये एक सेन्सरही बसवण्यात आला आहे, ज्यामुळे किस करताना ओठांना खरोखरं किस करत असल्यासारखं वाटेल. या डिव्हाईसमध्ये ओठांचा दाब, हालचाल आणि तापमान देखील जाणवू शकते.
पाहा व्हिडीओ : लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमधील दुरावा होणार कमी
Remote kissing device recently invented by a Chinese university student. The device is designed specifically for long-distance relationships and can mimic and transfer the kiss of a person to the "mouth on the other side" pic.twitter.com/G74PrjfHQA
— Levandov (@blabla112345) February 23, 2023
'अशी' सुचली कल्पना
या रिमोट किसिंग डिव्हाईसच पेटंट चांगझोउ व्होकेशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेकाट्रॉनिक टेक्नॉलॉजीनं केलं आहे. याचा शोध लावणाऱ्या जियांग झोंगली या शास्त्रज्ञाने सांगितलं की, तो गर्लफ्रेडसोबत लाँग डिसटेन्स रिलेशनशिपमध्ये होता. अशावेळी भेटणं कठीण होतं, यामुळेच त्याला हे उपकरण बनवण्याची कल्पना सुचली.
किंमत किती आहे?
चायनीज ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Taobao वर या रिमोट किसिंग डिव्हाईसची किंमत 288 युआन (सुमारे 3400 रुपये) आहे. जर कोणी कपलने ऑर्डर केला तर त्यासाठी 550 युआन (सुमारे 6,000 रुपये) शुल्क आहे. दर महिन्याला 100 हून अधिक 'किसिंग उपकरणे' विकली जात असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.