(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO: शरयू नदीतच महिलेचे जबरदस्त ठुमके; व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त, म्हणाले...
Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात एक महिला शरयू नदीत उतरुन डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ अयोध्येचा असल्याचं म्हटलं जात आहे.
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल (Social Media Viral Video) होत असतात. धार्मिक स्थळावर रील्स, व्हिडीओ बनवणाऱ्यांवर तर नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. नुकताच अशाच एका घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक बाई शरयू नदीत उतरुन नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ अयोध्येतील (Ayodhya) राम की पौडीचा (Ram ki Pauri) आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी जहाल शब्दात प्रतिक्रिया देत आपला राग व्यक्त केला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटलं, अशा प्रकारचे रील बनवणं म्हणजे भक्तांच्या आस्थेशी खेळ करणं आहे. शरयू नदीत नाचणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर सर्वचजण संतापले आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये महिला ठुमके लगावत डान्स करताना दिसत आहे, पण लोकांना हा व्हिडिओ अजिबात आवडलेला नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
वास्तविक, अयोध्येतील राम की पौडीमध्ये भक्त अंघोळ करायला जातात, तेथे ते देवाची प्रार्थना करतात. मात्र शरयू नदीत अंघोळीसाठी आलेली एक महिला पाण्यात उतरुन चक्क नाचू लागली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती महिला बॉलीवूड स्टार बॉबी देओल आणि राणी मुखर्जी यांच्या 'जीवन में जाने जाना' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
धार्मिक स्थळावर नाचणं भोवणार?
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी विविध संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही तपासाचे आदेश दिले आहेत. अयोध्येच्या प्रभारी निरीक्षकांना चौकशी करून महिलेवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
“क्या फ़िल्मी चकाचौंध में आस्था पीछे छूटती जा रही है?”
— SANJAY TRIPATHI (@sanjayjourno) October 10, 2023
अयोध्या में राम की पैड़ी पर रील बनाते एक महिला का वीडियो हुआ वायरल। पूर्व में भी कई बार राम की पैड़ी से ऐसे वीडियो हुए हैं वायरल। pic.twitter.com/fKpOotFlJv
नेटकऱ्यांनी दिल्या संतप्त प्रतिक्रिया
या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने म्हटलं की, 'आमचं आता वय झालं आणि नव्या पिढीची प्रायोरिटीच आम्हाला समजत नाही.' दुसर्या एका व्यक्तीने म्हटलं की, 'या मानसिकतेच्या महिलांना किंवा पुरुषांना फक्त त्यांचे रील व्हायरल व्हावेत एवढंच वाटत असतं. सर्वप्रथम आपण त्यांचे रील व्हायरल करणं बंद केलं पाहिजे, जेणेकरून त्यांचे प्लॅन फ्लॉप होतील.'
हेही वाचा: