NASA : मंगळ किंवा चंद्र नाही, तर 'या' ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता? नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने लावला शोध
NASA : या ग्रहाची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा ग्रह पृथ्वीपेक्षा मोठा आहे. या अनोख्या आणि जीवसृष्टीची शक्यता असलेल्या ग्रहाबद्दल जाणून घ्या.
NASA James Webb Space Telescope : पृथ्वी (Earth) वरील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे आता मानवासाठी पृथ्वी कमी पडत चालली आहे, म्हणूनच मानव आता इतर ग्रहांवर जीवनाचा शोध घेत आहे. सध्या आपण चंद्र (Moon) आणि मंगळावर (Mars) पोहोचलो आहोत, पण इथे जीवसृष्टीची शक्यता नाही. मात्र, आपण ज्या ग्रहाबद्दल बोलत आहोत, तेथे जीवनाची शक्यता खूप जास्त आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाचा असा विश्वास आहे की, या ग्रहावर पाण्याने भरलेल्या महासागरांचे संकेत आहेत असा आहे. या अनोख्या आणि जीवसृष्टीची शक्यता असलेल्या ग्रहाबद्दल जाणून घ्या.
नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने या ग्रहाचा शोध लावला
अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने या ग्रहाचा शोध लावला आहे. या दुर्बिणीने सूर्यमालेपासून दूर असलेल्या एक्सोप्लॅनेटचे निरीक्षण केले, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की येथे जीवनाची शक्यता इतर कोणत्याही ग्रहापेक्षा जास्त आहे. या एक्सो प्लॅनेटच्या वातावरणात मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले. या नव्या ग्रहावर हायड्रोजन समृद्ध वातावरण आणि पाण्याने भरलेला महासागर निर्माण होण्याची चिन्हे असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह
या ग्रहाची सर्वात खास गोष्ट म्हणजे तो पृथ्वीपेक्षा मोठा आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा 8.6 पट मोठा आहे. या नव्या ग्रहावर हायड्रोजन समृद्ध वातावरण निर्माण असल्याची चिन्हे असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, त्याच्या पृष्ठभागावर मोठ्या समुद्र असल्याचे संकेत देखील आढळले आहेत. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, या ग्रहावरून ज्या प्रकारचे संकेत मिळत आहेत, ते पाहता येथे जीवसृष्टी असण्याची शक्यता नक्कीच आहे.
या ग्रहाचे नाव काय?
आपण ज्या ग्रहाबद्दल बोलत आहोत, त्याला शास्त्रज्ञ k2-18b म्हणून ओळखतात. हा ग्रह k2-18 या ताऱ्याभोवती फिरतो. K2-18 आपल्या पृथ्वीपासून 120 प्रकाशवर्षे दूर आहे. 2015 मध्ये नासाच्या केपलर स्पेस टेलिस्कोपने या ग्रहाचा शोध लावला होता. मात्र, आता जेम्स वेब टेलिस्कोप त्यावर लक्ष ठेवून आहे.
पृथ्वीशिवाय विश्वात जीवसृष्टी?
अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं नुकताच यूएफओवर आधारित आपला अहवाल प्रसिद्ध केला होता. सुमारे एक वर्ष UFO (अन-आयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट) चा अभ्यास केल्यानंतर नासानं हा अहवाल जारी केला आहे. नासाच्या या 33 पानांच्या अहवालात यूएफओ हे आपल्या ग्रहाचे सर्वात मोठं रहस्य असल्याचं वर्णन करण्यात आलं आहे. हा अहवाल प्रसिद्ध करताना अमेरिकन स्पेस एजन्सीचे बिल नेल्सन म्हणाले की, त्यांचा असा विश्वास आहे की, पृथ्वीशिवाय विश्वात जीवसृष्टी (एलियन) आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या