Jaipur: तरुणाने Money Heist स्टाईलमध्ये पाडला पैशांचा पाऊस; पैसे उचलायला लोकांची गर्दी, व्हिडीओ व्हायरल
Jaipur Notes Blown In Air: व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जयपूरमधील शॉपिंग मॉलसमोरील आहे, ज्यात एक तरुण गाडीवर चढून नोटा हवेत उधळत आहे.
Jaipur Notes Blown In Air: सोशल मीडियावर (Social Media) नाव कमावण्यासाठी आजकाल लोक काहीही करायला तयार आहेत. दररोज असे अनेक व्हिडीओ समोर येतात, ज्यात लोक बऱ्याच विचित्र आणि हैराण करुन सोडणाऱ्या गोष्टी करताना दिसतात. याच कारणामुळे त्यांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होतात. असाच एक व्हिडीओ जयपूरमधून (Jaipur) देखील समोर आला आहे, ज्यात एक व्यक्ती गाडीवर चढून नोटांचा (Notes) पाऊस पाडताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय, यावर अनेक लोक चित्र-विचित्र प्रतिक्रिया देखील देत आहेत.
मनी हाईस्ट स्टाईलमध्ये उडवल्या नोटा
व्हायरल होत असलेला व्हिडीओ जयपूरच्या एका शॉपिंग मॉलसमोरचा आहे, जिथे भर रस्त्यात लोकांची मोठी गर्दी जमली आहे. मॉलच्या एकदम समोरच एक व्यक्ती गाडीवर चढला आहे, ज्याने नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित सिरीज (Netflix Series) मनी हाईस्ट मधील पात्रासारखे (Money Heist Character) लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यासोबत अगदी त्याच स्टाईलचं मास्क देखील त्याने लावलं आहे.
हा तरुण अगदी मनी हाईस्ट स्टाईलमध्येच बॅगेतून पैसे काढतो आणि काढलेल्या नोटा हवेत उधळतो. हवेत नोटांचा पाऊस पाहून आजूबाजूचे लोक नोटा उचलण्यासाठी तुटून पडतात. रस्त्यावरुन बाजूने जात असलेले रिक्षावाले देखील थांबतात आणि अगदी काही सेकंदांत मॉलसमोर लोकांची गर्दी जमते. सर्व लोक मजबूत नोटा लुटायचा आनंद घेतात, ज्याच्या हातात जितक्या नोटा लागतात, तितक्या प्रत्येकजण उचलून घेतो.
राजनेता ही नहीं पैसे तो जनता के पास भी है!
— Pawan Gaur 🇮🇳 (@pawangaursahab) October 3, 2023
नोट उड़ाने का वीडियो जयपुर का बताया जा रहा है, वायरल है। #Rajasthan #Jaipur #viralvideo pic.twitter.com/ec8c5lWiha
लोकांनी घेतली मज्जा
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अगदी काही वेळातच हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. सध्या लोक हा व्हिडीओ पाहून खूप आनंद घेत आहेत. काही लोक कमेंट्समध्ये म्हणतात की, केवळ मोठ्या नेत्यांकडेच नाही, तर अनेक लोकांकडेही खूप पैसे आहेत. दुसरीकडे काही लोक या तरुणाविरोधात कारवाईची मागणी करत आहेत, कारण या तरुणामुळे त्या वेळी रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती.
हेही वाचा: