Reverse Waterfall : आश्चर्यच! धबधब्यातून पाणी खाली येण्याऐवजी चक्क वर जातंय; सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
Reverse Waterfall Video Viral : उलटा धबधबा कधी पाहिला आहे का? हा एक रिव्हर्स वॉटरफॉल आहे. असा धबधबा जिथून पाणी खाली नाही तर वर जातंय.
Reverse Waterfall Video Viral : उलट्या धबधब्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या धबधब्याचे पाणी खालच्या दिशेने न जाता वरच्या दिशेने वाहत आहे. हे खूपच आश्चर्यकारक आहे. उन्हाळ्यात आपण अनेकदा हिल स्टेशनवर फिरायला जातो. आपल्याला डोंगरात सुंदर धबधबेही पाहायला मिळतात, पण उलटा धबधबा कधी पाहिला आहे का? हा एक रिव्हर्स वॉटरफॉल आहे. असा धबधबा जिथून पाणी खाली जात नाही तर डोंगरावर जाते. हे ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये धबधबा खाली न जाता वरच्या दिशेने वाहत आहे. लाखो वेळा पाहण्यात आलेला हा व्हिडिओ एका आयएएस अधिकाऱ्याने शेअर केला आहे. धबधबा उलटून वाहण्याचे कारणही त्यांनी दिले आहे.
When the magnitude of wind speed is equal & opposite to the force of gravity. The water fall at its best during that stage in Naneghat of western ghats range.
— Susanta Nanda IFS (@susantananda3) July 10, 2022
Beauty of Monsoons. pic.twitter.com/lkMfR9uS3R
हा धबधबा महाराष्ट्रात आहे
IFS सुसंता नंदा यांनी या उलट्या धबधब्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, हा धबधबा महाराष्ट्रातील नाणेघाट हिल स्टेशनमध्ये आहे. त्यांनी पुढे लिहिले की, 'जेव्हा वाऱ्याच्या वेगाची तीव्रता गुरुत्वाकर्षणाच्या बलाच्या समान आणि विरुद्ध असते. त्यानंतर पश्चिम घाटाच्या रांगेतील नाणेघाट येथे हा धबधबा उत्तम प्रकारे पडतो. हे पावसाळ्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
हे दृश्य आश्चर्यकारक आहे
IFS अधिकाऱ्याच्या या व्हिडिओला 3.80 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हिरव्यागार डोंगरातून पाणी कसे वाहत आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, पण वारा इतका जोराचा आहे की प्रवाह खाली येण्याऐवजी वर जात आहे. हे दृश्य अप्रतिम आणि अतिशय सुंदर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या