(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ziya Paval-Zahhad: ट्रान्सजेंडर जोडप्याच्या घरी बाळाचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी
केरळमधील (Kerala) जिया आणि जहाद या ट्रान्सजेंडर जोडप्याच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. जहादनं एका सरकारी दवाखान्यामध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला.
Kerala Trans Couple Ziya Paval-Zahhad Blessed With Baby: भारतातील (India) एक ट्रान्सजेंडर जोडपं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. केरळमधील (Kerala) जिया (Ziya Paval) आणि जहाद (Zahhad) या ट्रान्सजेंडर जोडप्याच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. जहादनं एका सरकारी दवाखान्यामध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला.
जियानं दिली माहिती
बुधवारी (8 फेब्रुवारी) जिया आणि जहाद यांच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. जियानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'बुधवारी सकाळी जहादनं सरकारी रुग्णालयात सिजेरियनद्वारे बाळाला जन्म दिला आहे. जहाद आणि बाळ दोघांची तब्येत ठिक आहे.' जहाद आणि जिया यांनी बाळाच्या जेंडरबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
जियानं सोशल मीडियावर बाळाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जिया आणि जहाद यांचे बाळानं जियाचं बोट धरलं आहे. या फोटोला कमेंट करुन अनेकांनी जिया आणि जहादला शुभेच्छा दिल्या आहेत. जहादची डिलेव्हरी डेट मार्चमध्ये होती पण एक महिन्याआधीच जहाद आणि जियाच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे.
View this post on Instagram
जिया आणि जहाद गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत आहेत. काही दिवसांपूर्वी जिया आणि जहादनं त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन जिहादच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले होते, 'मी जन्मापासूनच महिला नाही. पण आई होण्याचं स्वप्न मी पाहिलं आहे. एखाद्या मुलाने मला आई म्हणून हाक मारावी अशी माझी नेहमीच इच्छा होती. तीन वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. आता माझं आई होण्याचं आणि जिहादचं बाबा होण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. जिहादच्या पोटात आमचं आठ महिन्यांचं बाळ आहे.' ही भारतातील पहिली ट्रान्समॅन प्रेग्नन्सी आहे, असंही म्हटलं जातंय.
View this post on Instagram
लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर जिया पुरुषाची महिला झाली आणि जहाद महिलेचा पुरुष. दरम्यान, लिंग बदल करताना जिहादच्या शरीरात असणारे गर्भाशय आणि महिलांमध्ये असणारे काही अवयव शरीराबाहेर काढण्यात आले नव्हते. यामुळेच शस्त्रक्रियेच्या मदतीने जहादला पुरुष झाल्यानंतरही गर्भधारण करता आलं.
महत्त्वाच्या बातम्या: