(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Israel: कोण होते इस्रायल? ज्यांच्या नावाने ज्यू लोकांनी वसवला स्वतंत्र देश
Hamas Israel War: हमाससोबतच्या युद्धामुळे इस्रायल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इस्रायलच्या निर्मितीचा इतिहास या देशातील लोकांचा इतिहास खूपच रंजक आहे.
Hamas Israel War: गेल्या अनेक दिवसांपासून जगभरात इस्रायल (Israel) चर्चेचा विषय राहिला आहे. अतिरेकी संघटना हमासच्या (Hamas) सैनिकांनी सुमारे 14 दिवसांपूर्वी अचानक इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला, त्यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली. या संघर्षात आतापर्यंत सुमारे 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायल हा ज्यू (Jew) देश आहे, ज्याच्या स्थापनेपासून वाद सुरू झाले आहेत आणि आतापर्यंत त्या देशात अनेक युद्धं झाली आहेत. आजूबाजूचे मुस्लिम देश इस्रायलचे कट्टर शत्रू आहेत. इस्रायलचा इतिहास बराच जुना आहे, ज्यूंनी आपल्या देशाचं नाव इस्रायल का ठेवलं हे तुम्हाला माहीत आहे का?
अशाप्रकारे पडलं इस्रायलचं नाव
इस्त्रायल हे नाव एका पैगंबरांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे, ज्यांना ज्यू लोक आपला देव मानतात. असं मानलं जाते की ज्यू धर्माची सुरुवात पैगंबर हजरत इब्राहिम यांच्यापासून झाली, ज्यांच्या वंशजांपैकी एकाचं नाव इस्रायल होतं. यावरुन ज्यूंनी त्यांच्या देशाचं नाव इस्रायल ठेवलं.
यहूदाहून बनलं यहुदी
असं मानलं जातं की, पैगंबरांचे वंशज असलेल्या इस्रायलला 12 मुलगे होते, ज्यांच्यापासून 12 वेगवेगळ्या जमाती तयार झाल्या. यांपैकी सर्वात प्रमुख पुत्र यहूदा होता, ज्याला जुडाह असंही म्हणतात. यानंतर त्यांना मानणाऱ्यांना यहूदी म्हटलं गेलं. यहुदी धर्मीयांना इंग्रजीत ज्यू म्हणतात. यहूदी, ख्रिश्चन आणि मुस्लिम हजरत इब्राहिम यांना त्यांचा महान पैगंबर किंवा देव मानतात.
यानंतर ज्यू हजरत मोसेस यांना आपला शेवटचा पैगंबर मानतात. मोसेस ज्यूंचा कायदाकर्ता असल्याचं म्हटलं जाते. त्यांनी पूर्वीपासून अस्तित्वात असलेली परंपरा प्रस्थापित केली आणि ती लोकांसमोर धर्म म्हणून मांडली. त्याचप्रमाणे ज्यू जगभर पसरू लागले आणि त्यांनी त्यांचा धर्म वाढवण्याचं काम केलं. तथापि, ज्यू धर्मांतरावर विश्वास ठेवत नाहीत, म्हणूनच त्यांची लोकसंख्या फारच कमी आहे.
भारतातील ज्यूंचा इतिहास
असे मानले जातं की, ज्यू 2000 वर्षांपूर्वी भारतात आले. केरळच्या मलबार किनार्यावरून त्यांनी प्रथम भारतीय भूमीवर पाऊल ठेवलं, त्यानंतर ते हळूहळू भारताच्या प्रत्येक भागात पोहोचले. जर्मन न्यूज वेबसाइट DW च्या रिपोर्टनुसार, 1940 च्या दशकात भारतात ज्यूंची लोकसंख्या सुमारे 50 हजार होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ज्यू लोक भारतीय सैन्यात देखील होते. 1924 मध्ये जन्मलेल्या J.F.R. जेकबने भारतीय सैन्यात भरती होऊन आपल्या देशाची सेवा केली आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारतात ज्यूंची धार्मिक स्थळंही
खबाद हाऊस (Khabad House) ज्यूंसाठी खूप खास आहे, तुम्हाला बहुतेक देशांमध्ये हे आढळेल. खबाद हाऊसमध्ये ज्यू लोक प्रार्थना करतात. भारतातही हे खबाद हाऊस आढळतात. दिल्लीतील पहाडगंज, अजमेर, हिमाचलचं धरमकोट, राजस्थानचं पुष्कर आणि मुंबईतही ज्यू धर्मीयांचे खबाद हाऊस बांधण्यात आले आहेत. भारतभेटीसाठी येणारे इस्रायली येथे प्रार्थना करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दरवर्षी इस्रायलमधील हजारो पर्यटक हिमाचल प्रदेशातील धरमकोट, धर्मशाला येथील खबाद हाऊसला भेट देण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी येतात.
हेही वाचा:
Albert Einstein: अल्बर्ट आइनस्टाईन देखील होते ज्यू; त्यांनी हिटलरपासून 'अशा' प्रकारे वाचवला आपला जीव