Albert Einstein: अल्बर्ट आइनस्टाईन देखील होते ज्यू; त्यांनी हिटलरपासून 'अशा' प्रकारे वाचवला आपला जीव
Albert Einstein: जगातील सर्वात बुद्धिमान माणूस अल्बर्ट आइनस्टाईन हिटलरच्या काळात जर्मनीत राहत होता, हिटलरने ज्यूंचा नरसंहार सुरू केला तेव्हा त्यांना तिथून पळून जावं लागलं.
Albert Einstein: इस्रायल आणि हमास (Hamas) यांच्यातील युद्ध कधी संपणार याचं उत्तर सध्या कोणाकडेच नाही. एकीकडे इस्रायलने (Israel) हमास या अतिरेकी संघटनेचा नाश करण्याची शपथ घेतली आहे, परिणामी दुसरीकडे हजारो निष्पाप लोक मरण पावत आहेत. इस्रायल हा एक छोटासा देश आहे, जिथे ज्यू मोठ्या संख्येने राहतात. या देशाच्या शेजारील सर्व देश इस्रायलचे शत्रू असून ते नेहमी इस्रायलमधील ज्यूंवर हल्ले करत असतात.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या काळात ज्यूंच्या संदर्भात अनेक गोष्टींवर चर्चा होत आहे. यातच तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती अल्बर्ट आइन्स्टाईन (Albert Einstein) हे देखील ज्यू (Jew) होते. ते हिटलरच्या काळात जर्मनीत राहत होते, आपला जीव वाचवण्यासाठी त्यांना तिथून पळून जावं लागलं होतं.
जर्मनीत वास्तव्यास होते आइन्स्टाईन
खरं तर इस्रायलच्या आधी युरोपमध्ये ज्यूंची लोकसंख्या सर्वाधिक होती. त्या काळी जर्मनीतही लाखो ज्यू राहत होते, त्यापैकी अल्बर्ट आइनस्टाईनही एक होते. अॅडॉल्फ हिटलरच्या निवडीनंतर जर्मनीमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वेगाने पसरू लागली, ही भावना गैर-युरोपियन लोकांकडे होती. याद्वारे ज्यूंबद्दल जास्तीत जास्त द्वेष पसरू लागला.
अमेरिकेत घ्यावा लागला आश्रय
हिटलरने जर्मनीत नरसंहार सुरू केला तेव्हा अनेक ज्यू आपला जीव वाचवण्यासाठी पळून जाऊ लागले. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनाही माहीत होतं की, आता इथे राहणं हे अधिक धोक्याचं आहे. त्यामुळे त्यांनी अमेरिकेत पळ काढला आणि तिथे आश्रय घेतला. या काळात आइन्स्टाईन यांचं नाव विज्ञानाच्या जगात अव्वल स्थानावर होतं. त्यांच्यासोबत जर्मनीतील अनेक विद्वान आणि शास्त्रज्ञ अमेरिकेत गेले. या काळात हिटलरने सुमारे 6 दशलक्ष लोक मारले होते, ज्यात बहुतेक ज्यू धर्मीय होते.
जगभरातील ज्यू लोकसंख्येबद्दल बोलायचं झालं, तर त्यांची जगभरातील लोकसंख्या 20 कोटींपेक्षा कमी आहे. त्यापैकी बहुतेक ज्यू इस्रायलमध्ये राहतात. याशिवाय अमेरिका, कॅनडा, फ्रान्स आणि ब्रिटनमध्येही ज्यू राहतात.
हिंदू धर्मापेक्षा किती वेगळा आहे ज्यू धर्म?
ज्यू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक आहे. जर तुम्ही या धर्माचा खोलवर अभ्यास केला तर तुम्हाला समजेल की याचा इतिहास सुमारे 3000 वर्षे जुना आहे. ख्रिश्चन (Christian), इस्लाम (Islam) आणि ज्यू (Jews) धर्माची सुरुवात त्याच काळात झाली असं म्हणतात. यामुळेच त्यांच्यात बरंच साम्य आहे. दुसरीकडे, जर तुम्ही ज्यू धर्माची हिंदू (Hindu) धर्माशी तुलना केली तर तुम्हाला केवळ काही गोष्टींतच समानता दिसेल.
सविस्तर वाचा:
Facts: हिंदू धर्मापेक्षा किती वेगळा आहे ज्यू धर्म? 'अशा' प्रकारे करतात पूजा