Miss World 2021 : 12 व्या वर्षापासून हृदयरोगाशी संघर्ष, अपघाताने चेहराही विद्रूप, आता परिस्थितीला हरवलं, मिस वर्ल्डची Runner-Up
Miss World 2021 Runner-up : भारतीय वंशाची अमेरिकन श्री सैनी हिने संकटाचा सामना करत उपविजेतेपदापर्यंत मजल मारली. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना श्री सैनीचा चेहराही विद्रुप झाला होता, पण तिने हार मानली नाही.
Miss World 2021 Runner-up : यंदाच्या मिस वर्ल्ड 2021 खिताबावर पोलंडच्या कॅरोलिना बिलाव्स्का (Karolina Bielawska) हिने नाव कोरलं आहे. भारतीय वंशाची अमेरिकन श्री सैनी उपविजेती ठरली आहे. तर मिस इंडिया मनसा वाराणसी (Miss India Mansa Varanasi) टॉप 13 च्या यादीत प्रवेश केल्यानंतर टॉप 6 मध्ये ही स्थान मिळालं नाही. भारतीय वंशाची अमेरिकन श्री सैनी हिने संकटाचा सामना करत उपविजेतेपदापर्यंत मजल मारली. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना श्री सैनीचा चेहराही विद्रुप झाला होता, पण तिने हार मानली नाही. परिस्थितीवर मात करत मिस वर्ल्डच्या अंतिम फेरीत मजल मारली. श्री सैनीचा संघर्ष आजच्या घडीला अनेकांना प्रेरणा देणारा आहे... जाणून घेऊयात श्री सैनी हिच्याबद्दल....
मूळची लुधियानाची आहे श्री सैनी –
कोरोना महामारीमुळे मिस वर्ल्ड 2021 स्पर्धा झाली नव्हती. यंदा सॅन जुआन, प्यूर्टो रिकोमध्ये याचं आयोजन करण्यात आले. ही 70 वी मिस वर्ल्ड स्पर्धा आहे. श्री सैनी ही या स्पर्धेत उपविजेती राहिली आहे. श्री सैनी मूळची पंजाबमधील लुधियाना येथील आहे. लुधियाना येथे श्री सैनीचा जन्म झाला आहे.
वॉशिंगटनमध्ये राहाते –
25 वर्षीय श्री सैनी मूळची पंजाबमधील लुधियानाची आहे. पाच वर्षाची असताना वडील संजिव सैनी आणि आई एकता सैनी अमेरिकेच्या वॉशिंगटनमध्ये शिफ्ट झाले होते. वॉशिंगटमध्ये श्री सैनी हिने शिक्षणासोबत सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. तसेच कमी वयात मॉडेलिंगमध्येही आपलं नाव कमावले.
12 वर्षांपासून पेसमेकरवर –
धक्कादायक बाब म्हणजे, श्री सैनी 12 वर्षांची असताना तिला ह्रदयाच्या आजाराशी सामना करावा लागला. वयाच्या 12 व्या वर्षांपासून श्री पेसमेकरवर आहे.
अपघात चेहरा विद्रुप –
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना श्री सैनीचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये श्रीचा चेहरा विद्रुप झालेला. मिस वर्ल्ड स्पर्धेदरम्यान, श्री सैनीने आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. अपघातात चेहरा विद्रुप झाल्यानंतरही श्री सैनीने हार मानली नाही. श्री सैनीने परिस्थितीवर मात करत रनरअपपर्यंत मजल मारली. श्री सैनी हिची जिद्द आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
View this post on Instagram
97 देशांतील स्पर्धक सहभागी
यंदाची ही 70 वी मिस वर्ल्ड स्पर्धा होती. ज्यामध्ये 97 देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यापूर्वी 2020 मध्ये होणार होता, परंतु कोविडमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. यावेळी फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2020 मनसा वाराणसीने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यंदाची मिस वर्ल्ड 2021 ही पोलंडची कॅरोलिना बिलाव्स्का आहे. युनायटेड स्टेट्सची श्री सैनी ही पहिली उपविजेती आणि कोट डी'आयव्होरची ऑलिव्हिया येस ही दुसरी उपविजेती आहे. कॅरोलिनाने 17 मार्च (IST) रोजी सॅन जुआन, पोर्तो रिको येथे आयोजित मिस वर्ल्ड स्पर्धेची प्रतिष्ठित 70 वी आवृत्ती जिंकली.