Video Viral : ही तर आगीची नदी..आइसलँडमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, ड्रोन फुटेज समोर
Volcano Viral Video: काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील ग्वाटेमालामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. ज्वालामुखीच्या उद्रेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
Volcano Viral Video : काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील ग्वाटेमालामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. ज्वालामुखीच्या उद्रेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडीओही जुना झाला नव्हता की, आइसलँडमधून ज्वालामुखीचा उद्रेक आणि निघणाऱ्या लाव्हाचा व्हिडीओही समोर आला आहे.
Spectacular drone footage flying over lava fields and an erupting volcano in Iceland by Bjorn Steinbekk.pic.twitter.com/WHuJjFUT4S
— Wonder of Science (@wonderofscience) July 19, 2022
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर आलेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ज्वालामुखीतून लाल लाव्हा वाहत असल्याचे पाहू शकता. ज्वालामुखीतून लाव्हा वाहत असल्याचा व्हिडिओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. ब्योर्न स्टेनबेक नावाच्या छायाचित्रकाराने हा व्हिडीओ टिपला आहे. ड्रोनमधून टिपलेला हा व्हिडिओ खरोखरच अप्रतिम आहे. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लाव्हाचं तापमान 1000 अंश सेल्सिअस असल्याचं म्हटलं जातं. आता तुम्हीच अंदाज लावू शकता, की ते किती भयानक असू शकते. या उकळत्या लाव्हाभोवती राहणे म्हणजे जीवाला धोकाच...ज्वालामुखीचा गरम लावा कशाप्रकारे वेगाने वाहतोय? हे दृश्य पाहून कोणीही म्हणेल, जणू काही आगीची नदी आहे.
31 हजारांहून अधिक युजर्सनीही व्हिडीओला लाईक केले
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर वंडर ऑफ सायन्स नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. 19 जुलै रोजी पोस्ट केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 2.9 दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. 31 हजारांहून अधिक युजर्सनीही व्हिडीओला लाईक केले आहे. ट्विटर युजर्सही यावर कमेंट करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या