(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UK PM Election : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषि सुनक यांचं पारड आणखी जड, तिसऱ्या फेरीत 115 मतांनी विजयी
Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषि सुनक तिसऱ्या फेरीतही 115 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात कंजर्वेटिव पक्षाचे (Conservative Party) तीन उमेदवार आहेत.
UK PM Election : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषि सुनक (Rishi Sunak) यांचं पारड आणखी जड झालं आहे. ऋषी सुनक यांचा ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील तिसऱ्या फेरीतही विजय झालं आहे. ऋषी सुनक तिसरी फेरीत 115 मतांनी जिंकले आहेत. ऋषी सुनक यांनी सर्वांचे आबार मानले आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषि सुनकल आघाडीवर आहेत.
आज ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी चौथ्या फेरीतील मतदान पार पडणार आहे. तिसऱ्या फेरीतील विजयानंतर ऋषि सुनक यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, आपण सर्व मिळून ब्रिटनला आणखी ताकतवान बनवू. त्यांनी म्हटलं की, आपण सर्वजण मिळून देशाच्या अर्थव्यवस्था आणखी बळकट बनवू.
कोण आहेत ऋषि सुनक?
ऋषी सुनक यांचे आईवडील भारतीय वंशाचे होते. पण त्याचं कुटुंब पूर्व आफ्रिकेतीन ब्रिटनमध्ये आले होते. त्यांनी ऑक्सफर्डमधील राजकारण आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. स्टॅनफोर्ड विद्यापीठातीन एमएचं शिक्षण घेतलं. ऋषी सुनक इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. मुलगी अक्षतासोबत लग्न केले आहे. 2015 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले.
ऋषी सनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड का होऊ शकते?
ऋषी सुनक यांची प्रतिमा चांगली आहे. त्यांनी कोरोनाच्या चांगलं काम केलं आहे. कोरोनाच्या काळात ऋषी सुनक यांनी देशाला मंदीतून यशस्वीपणे बाहेर काढलं. सर्व विभागांना खूश करण्यात ऋषी सुनक यशस्वी ठरल्याने त्याचे कौतुकही होत आहे. याशिवाय सरकारमधील ऋषी सुनक एक महत्त्वाचा चेहरा होते. अनेक प्रसंगी, ऋषी यांनी बोरिसऐवजी टीव्हीवरील चर्चासत्रांमध्ये भाग घेतला. त्यामुळेच भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- UK PM Election : पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषि सुनक एक पाऊल पुढे, मतदानाच्या दुसऱ्या फेरीतही आघाडी
- ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांना मोठं यश, मतदानाच्या पहिल्या फेरीत मारली बाजी
- UK Prime Minister : ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानाची घोषणा 5 सप्टेंबर रोजी; 11 जणांची नावं चर्चेत
- Britain Political Crisis : भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी वर्णी? कोण आहेत ऋषि सुनक?