(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO: जिममध्ये 'असे' प्रकार करणं पडेल महागात; जिवाशी खेळ करुन अनेकांनी गमावले जीव
Gym Video: सध्या जिमशी संबंधित अनेक धक्कादायक प्रकरणं समोर येत आहेत. नुकताच एका महिलेचा जिममधील व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यात जिमच्या उपकरणांशी मस्ती करणं तिला भोवलं आहे.
Viral Gym Video: आजकाल तरुणाईमध्ये बॉडी बनवण्याचं फॅड वाढलं आहे. अनेकांनी फिट राहण्यासाठी जिममध्ये (Gym) जाणं सुरू केलं आहे. तरुणाई जिममध्ये जाऊन बॉडी बनवण्यासाठी विविध जड उपकरणं (Heavy Equipments) उचलतात आणि विविध प्रकारचे व्यायाम (Exercise) करतात. जिममधील उपकरणं खूप जड असल्याने ते वापरताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे. असं असताना, काही लोकांना जिम म्हणजे एक खेळ वाटतो. जिममधील उपकरणं अनेकांना खेळ वाटतात आणि त्यांच्याशी ते खेळू लागतात, पण असं करणं अनेकांच्या जीवाशी बेतलं आहे. सध्या जिमशी संबंधित असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
जिममधील उपकरणांशी खेळणं पडलं महागात
एका महिलेला जिममधील उपकरणांशी मज्जा-मस्ती करणं चांगलंच महागात पडलं आहे. व्हिडीओमध्ये ही महिला ट्रेडमिलवर मस्ती करत असल्याचं दिसतं. ती ट्रेडमिलवर आरामात बसण्याचा प्रयत्न करत होती. खाली बसत असताना ट्रेडमिलवर पाय ठेवताच ती घसरली आणि थेट जमिनीवर आपटली. यावेळी तिच्या पाठीलाही मुकामार बसला.
विश्रांतीसाठी बसायला गेली ट्रेडमिलवर अन् झालं भलतंच
हा व्हिडिओ पाहता, ट्रेडमिलवर व्यायाम करून महिला थकल्याचं दिसत आहे. त्यानंतर ती थोडी विश्रांती घेण्यासाठी ट्रेडमिलवर बसायला गेली आणि तिथेच तिने चूक केली. तिने ट्रेडमिल तशीच सुरू ठेवली आणि त्यावरच ती बसायला गेली, त्यामुळे हा प्रकार घडला. जर महिलेने ट्रेडमिल बंद केली असती तर असं अजिबात घडलं नसतं.
डोकं जागेवर ठेऊन वापरा जिमची उपकरणं
इथे जाणून घेण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे, या महिलेला ट्रेडमिलवर बसायची गरज काय होती? विश्रांतीसाठी ही कोणती जागा होती? तिला इतकंच वाटत होतं तर ती आराम करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी बसू शकत होती, पण तिने तसं केलं नाही. आळस करुन ती ट्रेडमिलवरच जाऊन बसली आणि हा प्रकार घडला. ट्रेडमिलने तिला थेट जमिनीवर फेकून दिलं.
— BrainIess (@BrainIesspeople) August 30, 2023
याआधीही जिममुळे अनेकांनी गमावला जीव
तसं पाहायला गेलं तर, ही काही पहिली महिला नाही जिच्यासोबत जिममध्ये असा अपघात घडला. तर याआधीही अनेक वेळा जिममध्ये अशा प्रकारचे अपघात घडले आहेत. काहींनी तर अशा प्रकारच्या अपघातांत आपला जीव देखील गमावला आहे.
काही लोक अतिजड उपकरणं उचलल्यामुळे जीव गमावतात, तर काही लोकांचे जिममधील निष्काळजीपणामुळे अपघात होतात. तुम्हीही जर जिमला जात असाल किंवा जाणार असाल तर जिममधील उपकरणांशी मस्ती करू नका. सावधतेनं सर्व उपकरणं वापरा, मार्गदर्शकाच्या सूचनेशिवाय कोणतीही गोष्ट करू नका.
हेही वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )