Sarkari Nokar Bharti: कॅबिनेट सचिवालयात अधिकारी बनण्याची मोठी संधी; परीक्षा न देता मिळणार नोकरी, पगार 90000 रुपये
Cabinet Secretariat Recruitment 2023: भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयात अधिकारी बनण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या पदांवर नोकरी मिळवण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी.
Cabinet Secretariat Recruitment 2023: तुम्हीही सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्याच्या प्रयत्नात असाल आणि भारतातील सर्वोच्च ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर ही सुवर्णसंधी आहे. भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयाने एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये विविध प्रकारच्या पदांवरील भरतीबद्दल माहिती दिली आहे.
या अंतर्गत, संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि/किंवा कम्युनिकेशन, सिव्हिल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग यासारख्या अनेक शाखांमध्ये उप क्षेत्र अधिकारी (तांत्रिक) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
6 नोव्हेंबर 2023 पूर्वी करा अर्ज
या पदांवर थेट भरती मोहिमेअंतर्गत जॉईनिंग केली जाईल. यासाठी ग्रॅज्युएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंगचे (GATE) गुण (GATE 2021 किंवा 2022 किंवा 2023 मधील) याशिवाय काही शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 6 नोव्हेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.
कॅबिनेट सचिवालयात भरण्यात येणारी पदं
- संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान-60
- इलेक्ट्रॉनिक्स आणि/किंवा कम्युनिकेशन-48
- सिव्हिल इंजिनिअरिंग-2
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग-2
- गणित-2
- सांख्यिकी-2
- भौतिकशास्त्र-5
- रसायनशास्त्र-3
- मायक्रोबायोलॉजी-1
अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान आणि विज्ञान किंवा इतर कोणत्याही तांत्रिक किंवा वैज्ञानिक विषयातील पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. पात्रता/वयोमर्यादा/निवड प्रक्रियेसह तपशील आणि इतर गोष्टी अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला पाहता येतील.
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादेची अट
कॅबिनेट सचिवालयाच्या या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावं. 1-6-2023 रोजीच्या सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलतही लागू होईल.
निवड झाल्यावर मिळणारं वेतन
कॅबिनेट सचिवालय अंतर्गत या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना भत्ते आणि लाभांसह 90,000 रुपये पगार मिळेल.
कॅबिनेट सचिवालय भरती 2023 अधिसूचना पाहण्यासाठी लिंक - https://images.news18.com/ibnkhabar/uploads/2023/10/Cabinet-Secretariat-Recruitment-2023-Notification-2023-10-48af3f3bf2dd27263709b119d662c5c4.pdf?_gl=1*lsgxw*_ga*MTg4MDI5NDE2NS4xNjkwNzcxNTIx
याप्रमाणे करा अर्ज
अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. तुम्ही तुमचा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 6 नोव्हेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी अधिसूचनेत नमूद केलेल्या पत्त्यावर सबमिट करू शकता.
मुंबई पोलीस दलातही कंत्राटी पोलिसांची भरती
मुंबई पोलीस दलात 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्यानं घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीनं जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागानं हा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपये खर्चासही सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.
हेही वाचा: