ब्रा अन् शॉर्ट्स घालून रस्त्यावर फिरताना तरुणीने शेअर केला VIDEO, टीका झाल्यावर आता मागितली माफी
Indore Girl Reel Video : प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात एक तरुणी मोठ्या संकटात सापडली आहे. फेमस होण्याच्या नादात या तरुणीने इंस्टाग्राम आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केला.
Indore Girl Reel Video : आजकाल लोक कोणत्याही थराला जाण्याच्या तयारीत होतात. सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात एक तरुणी मोठ्या संकटात सापडली आहे. फेमस होण्याच्या नादात या तरुणीने इंस्टाग्राम आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तिला सर्वत्र विरोध होऊन लागला. नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली, यानंतर तिचं मतं परिवर्तन झालं आणि तिने माफी मागितली. इतकंच नाही, तर आत्महत्या करण्याची इच्छा असल्याचंही म्हटलं.
ब्रा अन् शॉर्ट्स घालून रस्त्यावर फिरताना तरुणीने बनवला व्हिडीओ
एका तरुणीने सोशल मीडियावर सेमी न्यूड व्हिडीओ पोस्ट करून खळबळ उडवली होती. ब्रा आणि शॉर्ट्समध्ये भररस्त्यात फिरणाऱ्या या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला होता. यानंतर परिस्थिती फार चिघळली आणि लोक तिला ट्रोल करु लागले. तिचे संस्कार आणि भारतीय संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करु लागले, यानंतर तरुणीला माफी मागावी लागली.
तरुणीने स्वतः शेअर केला व्हिडीओ
मध्य प्रदेशातील इंदूरमधील तरुणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ब्रा आणि शॉर्ट्स घालून एक तरुणी रस्त्यावर फिरतानाच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओ वरून वाद निर्माण झाला. वाद वाढत गेल्याने बुधवारी तरुणीने माफी मागितली. तरुणीने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मी सार्वजनिक ठिकाणी असे कपडे घालायला नको होते.
पाहा व्हायरल व्हिडीओ
Indore में एक लड़की ने भीड़ के बीच ब्रा और शॉर्ट्स पहनकर वीडियो शूट कराया। उसके बाद उसने इस वीडियो को इंस्टाग्राम पर पोस्ट कर दिया। विरोध बढ़ने पर अब माफी मांग रही हैं।#indoreviralvideo #Reel pic.twitter.com/QshQIS9444
— Aviral Singh (@aviralsingh15) September 26, 2024
तरुणीवर कारवाईची मागणी
ब्रा आणि शॉर्ट्स फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तरुणीने तिला आत्महत्या करायची असल्याचं म्हटलं आहे. तरुणीने सोशल मीडियावर दावा केला आहे की, ती संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरात राहते. तरुणीच्या या वादग्रस्त व्हिडीओवर सत्ताधारी भाजप, बजरंग दल आणि इतर संघटनांच्या नेत्यांनी आक्षेप घेत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :