Spam Call : आता स्पॅम कॉल आणि मेसेजपासून मुक्ती मिळणार, सोप्या तीन स्टेप्स फॉलो करून सेकंदात तक्रार करा
Cyber Fraud Alert : दूरसंचार विभाग (DoT) ने यूजर्सना बनावट कॉल आणि मेसेजची तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे. तीन सोप्या स्टेप्समध्ये अशी तक्रार कशी करायची ते त्यांनी स्पष्ट केलं आहे.
नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकांना रोज स्पॅम कॉल्स, फेक मेसेज येत असतात. अनेकजण त्याला बळी पडतात आणि त्यांची फसवणूक होते. त्यामुळे मोठा भुर्दंडही सहन करावा लागणार आहे. याला आता आळा घालण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाने काही पावले उचलली आहेत. दूरसंचार विभागाने एक नियमावली जारी केली असून केवळ तीन स्टेप्समध्ये यूजर्सना तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे यूजर्सना भविष्यात अशा प्रकारचे कोणतेही बनावट कॉल्स आणि मेसेज येणार नाहीत.
दूरसंचार विभागाने बनावट कॉल आणि एसएमएस टाळण्यासाठी वापरकर्त्यांना काही सूचना दिल्या आहेत. अलीकडच्या काळात बनावट कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होण्याच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत. या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने गांभीर्याने उपाययोजना केल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वी सरकारने अशा बनावट कॉल्स आणि मेसेजची तक्रार करण्यासाठी Chakshu पोर्टल सुरू केले होते. तसेच दूरसंचार विभाग (DoT) आणि TRAI ने दूरसंचार ऑपरेटर्सना त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक सूचना दिल्या आहेत.
बनावट कॉल आणि मेसेजची तक्रार अशी करा
स्मार्टफोन फक्त कॉल करण्यासाठी किंवा मेसेंजिंगसाठी वापरत नाहीत. त्याच्या माध्यमातून यूजर्स पैसे हस्तांतरित करतात आणि इतरही अनेक कारणांसाठी वापर केला जातो. अशा स्थितीत थोडासा निष्काळजीपणाही चांगलाच महाग पडू शकतो. हॅकर्स फेक कॉल्स आणि मेसेजद्वारे यूजर्सना नुकसान पोहोचवू शकतात.
दूरसंचार विभाग (DoT) ने वापरकर्त्यांना त्यांच्या अधिकृत X हँडलद्वारे बनावट कॉल आणि संदेशांची तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे. तीन सोप्या चरणांमध्ये ते कसे करायचे ते त्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी वापरकर्त्यांना सरकारच्या चक्षू (Chakshu) पोर्टलचा वापर करावा लागेल.
या तीन स्टेप्स फॉलो करा
1. संचार साथी पोर्टलला भेट द्या
2. Citizen Centric Services यावर क्लिक करा. त्यावर दिसणाऱ्या पहिल्याच Chakshu ब्लॉकवर क्लिक करा.
3. Report Suspected Fraud & Unsolicited Commercial Communication यामध्ये तुम्हाला येणारे स्पॅम कॉल्स आणि मेसेजचे डिटेल्स भरा.
SPAM CALL SPAM SMS 🫷
— DoT India (@DoT_India) September 22, 2024
3 simple steps to report
1) Visit Sanchar Saathi Portal
2) Click: ‘Citizen Centric Services’ > ‘Chakshu’
3) Report: Fill Spam calls/ SMS details pic.twitter.com/bJx74n3wsN
या पोर्टलवर आलेल्या अहवालाच्या आधारे दूरसंचार विभागाने 1 कोटीहून अधिक सिमकार्ड ब्लॉक केले आहेत. जर तुम्हालाही फेक कॉल्स येत असतील तर तत्काळ दूरसंचार विभागाला फेक कॉल्स आणि मेसेज कळवा, असे केल्याने अनेक यूजर्स फसवणूक होण्यापासून वाचू शकतात.
ही बातमी वाचा: