आता हेच बघायचं राहिलं होतं! नवरदेवासोबतच बाईकही डोक्यावर घेत वऱ्हाड्यांचा डान्स, व्हायरल VIDEO वर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
Groom Viral Video : वऱ्हाड्यांनी नवरदेवाला बाईकसोबतच खांद्यावर उचलून नाचायला सुरुवात केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा क्षण आहे. हा क्षण खास आणि अविस्मरणीय व्हावा, अशी सर्वांचीच इच्छा असते. आजकाल लोक आपल्या लग्नामध्ये विविध थीम आणि हटके प्लॅनिंग करुन लग्न खास करण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर असे लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दररोज नवनवीन व्हिडीओ समोर येतात. सध्या सोशल मीडियावर एख व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की म्हणालं की, आता हेच पाहायलं बाकी राहिलं होतं.
बाईकसोबतच नवरदेवाला घेतलं खांद्यावर आणि नाचायला सुरुवात
आम्ही असं का म्हणत आहोत, हे तुम्हाला व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर कळेल. तुम्ही आतापर्यंत वरातीमध्ये नवरदेवाला नाचताना किंवा वऱ्हाडी मंडळी नवरदेवाला उचलून घेऊन नाचताना पाहिलं असेल, असाच काहीसा पण त्याच्या एक पाऊस पुढे असलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये वऱ्हाड्यांनी नवरदेवाला चक्क बाईकसोबतच खांद्यावर उचलून नाचायला सुरुवात केल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
इंस्टाग्रामवर व्हिडीओ व्हायरल
एका इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. the_johar_ नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून हा मजेदार व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये सजलेला नवरदेव त्याच्या लग्नाच्या वरातीमध्ये दिसत आहे. डोक्यावर फेटा, डोळ्यावर गॉगल, गळ्यात हार अशा वेशात नवरदेव बाईक घेऊन वरातीत निघाला आहे. या नवरदेवाची वरात मात्र खूप खास आहे. या नवरदेवाच्या लग्नाच्या वरातील वऱ्हाडी मंडळींनी नवरदेवाला दुचाकीसह खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे. या आगळ्या-वेगळ्या वरातीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
View this post on Instagram
वरातीच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरदेव आणि वऱ्हाडी अतिशय आनंदी दिसत असून मस्ती करत आहेत. हा भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजने म्हटलं आहे की, आता हेच पाहायचं बाकी राहिलं होतं. दुसऱ्या एका नेटकऱ्यांने लिहिलं आहे की, एरोप्लेन नाही, थेट एरोस्प्लेंडर. आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, हे कारनामे पाहून नवरीस मंडपातून पळून जाईल. यासोबत अनेक मजेदार कमेंट या व्हिडीओवर देण्यात आल्या आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.