Trending: हॉरर फिल्मसाठी झाली काळ्या मांजरींची ऑडिशन; 152 मांजरींनी लावली रांग, फोटो व्हायरल
सध्या इन्स्टाग्रामवर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत बरेच लोक त्यांच्या काळ्या मांजरीसोबत उभे असल्याचं दिसतं. या फोटोमागील गोष्ट समजून घेऊया.
Treding: जगभरात विविध प्रकारचे चित्रपट (Films) बनवले जातात. काही चित्रपट रोमँटिक (Romantic Films), तर काही अॅक्शनने भरलेले (Action Films) असतात. काही चित्रपटांना मसाला आणि साहसी स्टंटचा तडकाही मारलेला असतो.
पण जगात असाही चित्रपट प्रकार आहे, जो पाहण्यासाठी सिनेमा रसिकांना साहस दाखवावं लागतं आणि तो म्हणजे हॉरर चित्रपट. हॉरर फिल्म बनवताना त्यातील भीती शेवटपर्यंत कायम ठेवावी लागते, अन्यथा चित्रपट कंटाळवाणा होऊ शकतो.
हॉरर फिल्मसाठी काळ्या मांजरींचं ऑडिशन
हॉरर फिल्म्समध्ये भीती कायम ठेवण्यासाठी कॉस्च्युम डिझाईनपासून (Costume Design) साऊंड ट्रॅकपर्यंत (Sound Track) बरंच काम केलं जातं. पाऊलखुणा (Footsteps), गडद सावल्या (Dark Shadows) आणि भुतांचा आवाज (Ghost Sound) देखील लोकांना घाबरवण्यासाठी वापरला जातो. काळ्या मांजरींचा (Black Cat) वापरही अनेकदा हॉरर चित्रपटांमध्ये केला जातो. हॉलिवूडमध्ये एकदा असं घडलं की, एका चित्रपटातील भूमिकेसाठी चक्क काळ्या मांजरींचं ऑडिशन घेण्यात आलं होतं. सध्या या ऑडिशनचा फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.
ऑडिशनसाठी दिलेली जाहिरात
त्याचं झालं असं की, 1962 साली हॉलिवूडमध्ये 'टेल्स ऑफ टेरर' नावाचा भुताचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात सर्व काही खरं ठेवायचं, असं दिग्दर्शकाने ठरवलं होतं. यासाठी काळ्या मांजरींचंही ऑडिशन (Black Cat Audition) घेण्यात आलं. त्यावेळी चित्रपटाच्या निर्मात्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती की, जर कोणाला चित्रपटात आपल्या मांजरीने भूमिका करावी, असं वाटत असेल तर ते त्यांच्या मांजरींना ऑडिशनसाठी घेऊन येऊ शकतात. यानंतर लोक त्यांच्या मांजरीसह हॉलिवूडमधील एन ब्रॉन्सन एव्हेन्यूमध्ये पोहोचले.
ऑडिशनसाठी आल्या होत्या 152 मांजरी
लोक आपल्या मांजरींना घेऊन येतील, अशी अपेक्षा निर्मात्यांना अजिबात नव्हती. पण त्यांनी स्टुडिओच्या बाहेर पाहिलं तर 152 मांजरी रांगेत उभ्या होत्या. त्यांच्या गळ्यात एक पट्टा होता, ज्याची दोरी त्यांच्या मालकांनी धरली होती. हा प्रसंग फोटोग्राफर राल्फ क्रेनने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. सध्या राल्फचा हा फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. 1961 च्या ऑडिशन दरम्यान त्याने हा फोटो क्लिक केला होता.
62 वर्ष जुना फोटो आता झाला व्हायरल
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये फूटपाथवर लोक उभं असल्याचं चित्र दिसत आहे. त्यांच्या काळ्या मांजरींना घेऊन ते उभे आहेत.
मांजरींच्या गळ्यात पट्टे बांधून त्यांना घेऊन त्यांचे मालक उभे आहेत. त्यांच्या मांजरीचा ऑडिशनचा टर्न कधी येतो? याची वाट ते पाहत आहेत, जेणेकरून ते ऑडिशनसाठी जाऊ शकतील. इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या फोटोला सहा लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. ज्या चित्रपटासाठी मांजरींचं ऑडिशन झालं तो 'टेल्स ऑफ टेरर' हा चित्रपट एडगर अॅलन पो यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित होता.
हेही वाचा:
4 महिन्यांच्या गरोदरपणानंतर दिला मुलीला जन्म; वजन फक्त 328 ग्रॅम, पालक चिंतेत