एक्स्प्लोर

BTS 10th Anniversary : जगाला भुरळ पाडणारे BTS! भाषेच्या मर्यादा ओलांडणाऱ्या बॉय बँडला 10 वर्ष पूर्ण; जाणून घ्या त्यांचा आतापर्यंतचा प्रवास

South Korea Boy Band BTS : BTS बॉय बँडला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. या सात जणांच्या बँडने जागतिक स्तरावर आपली छाप पाडत तरुणाईला भुरळ पाडली आहे.

BTS 10th Anniversary : अलिकडच्या काळात के-पॉपची (K-Pop) चलती आहे. BTS नं (Bangtan Boys) तर तरुणाईला अगदी भुरळ पाडली आहे. बीटीएस (BTS) या कोरियन बॉय बँडचा चाहता वर्ग जगभरात पसरला आहे. जगभरात करोडोंच्या संख्येने लोक त्यांच्या गाण्यांवर थिरकतात. आज 13 जून रोजी BTS बॉय बँडला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. या सात जणांच्या बँडने जागतिक स्तरावर आपली छाप पाडत दक्षिण कोरियाला (South Korea) एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. 13 जून 2013 साली BTS नं के-पॉप इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. यानंतर या 7 अवली पण प्रतिभावान पोरांनी नाव काढलं.

BTS ला बॉय बँडला 10 वर्ष पूर्ण

10 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने BTS नं चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. BTS मेंबर्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, दोन बीटीएसचे सदस्य सैन्यात भरती आहेत. 10 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर बीटीएसने नवं 'Take Two' हे गाणं रिलीज केलं आहे. सोशल मीडियावर BTS वर शुभेच्छांचा पाऊस पडला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by BTS official (@bts.bighitofficial)

BTS जगातील आघाडीच्या बँडपैकी एक 

के-पॉप संस्कृती जगभरात पोहोचवण्यामागे BTS फार महत्त्वाचा वाटा आहे. बिग हिट नावाच्या छोट्याशा कंपनी अंतर्गत पदार्पण करणारा BTS बॉय बँड आज जगातील आघाडीच्या बँडपैकी एक बनला आहे. त्यांनी कंपनीलाही मोठी भरभराट मिळवून दिली. BTS बॉय बँडने दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेलाही मोलाचा हातभार लावला आहे. जागतिक स्तरावर दक्षिण कोरियाला वेगळी ओळख मिळवून देण्यात BTS चं काम अमूल्य आहे. BTS मुळे दक्षिण कोरियाच्या टूरिझममध्येही वाढ झाली आहे.

जीन आणि जे-होप सैन्यदलात भरती

दक्षिण कोरियन कायद्यानुसार, दक्षिण कोरियातील शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पुरुषांना वयाच्या तिशीपर्यंत सुमारे दोन वर्ष राष्ट्रीय सेवेत काम करणं बंधनकारक असतं. 18 ते 28 वयोगटातील तरुणांना लष्करात 21 महिने, नौदलात 23 महिने किंवा हवाई दलात 24 महिने यापैकी एकाची निवड करावी लागते. याकायद्यानुसार, बीटीएस सदस्य जीन आणि जे-होप सैन्यदलात भरती झाले आहेत.

जगभरातील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य

BTS नं त्यांची म्युझिक आणि डान्सने जगभरातील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांची गाणी आणि म्युझिक व्हिडीओला युट्यूबवर मिलियन्सच्या संख्येने लाईक आणि व्हयूज पाहायला मिळतात. यावरून त्यांच्या चाहत्यांचा आकडा किती आहे याचा अंदाज येईल. अलिकडे पार पडलेल्या फिफा वर्ल्ड कपमध्येही BTS जंगकूकने खास परफॉर्मन्स दिला होता. 

जगभरातील असंख्य चाहते त्यांच्या आवडत्या के-पॉप सेलिब्रिटी (K-Pop Idol) ला भेटण्यासाठी आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी दक्षिण कोरियाला भेट देतात. यामुळे BTS बॉय बँड दक्षिण कोरियासाठी 'सॉफ्ट पावर'ही मानला जातो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Embed widget