Trending News : स्वत:ला आग लावत वधूवराची 'डेयरडेव्हिल एंट्री', थरारक स्टंटचा व्हिडीओ एकदा पाहाच
Viral Video : सध्या एका वधूवराच्या लग्नातील एंट्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याचं कारण म्हणजे या नवरा-नवरीने स्वत:ला आग लावत एंट्री केली आहे.
Trending Video : सध्या लग्नसराई सुरु आहे. आजकाल लोक स्वत:चा लग्न सोहळा लक्षात राहील असा स्पेशल आणि अविस्मरणीय करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसतात. कधी आकाशात, कधी पाण्याखाली असे लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या वधूवराने लग्नात एंट्री घेण्यासाठी चक्क स्वत:लाच आग लावून घेतली आहे. हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरा आणि नवरी स्वत:ला आग लावून अगदी 'डेयरडेव्हिल एंट्री' करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लग्नाच्या वेळी त्यांची एंट्री अविस्मरणीय बनवण्यासाठी एका जोडप्याने काहीतरी वेगळे करण्याचं ठरवलं. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारा वर हा स्टंटमॅन असून तो आपल्या नववधूसोबत हटके शैलीत लग्न समारंभात दाखल झाला.
View this post on Instagram
व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये, स्टंटमॅन गाबे जेसॉप आणि त्याची पत्नी अंबीर बंबीर मिशेल वधू आणि वर म्हणून दिसत आहेत. त्यानंतर एक व्यक्ती त्याच्या मागे जाऊन त्याला आग लावते आणि तो हळू हळू स्टेजकडे जाऊ लागतो. हे पाहून सोशल मीडिया यूजर्सचा श्वास रोखला गेला आहे. व्हिडिओच्या शेवटी, वराची टीम त्या दोघांवर कार्बन डायऑक्साइड वायू सोडून आग विझवताना दिसत आहे.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. अशी एंट्री घेणं प्रत्येकालाच आवडणारही नाही आणि जमणारही नाही. या थरारक एंट्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 79 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. नेटकरी या एंट्रीवर कमेंट करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्सने या एंट्रीला अतिशय धोकादायक स्टंट म्हटलं आहे. तर काहीजण याला वेडेपणाही म्हटला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Viral : शिक्षकाचा वाढदिवस साजरा करणं पडलं महागात; विद्यार्थ्याला सरांकडून फटक्यांचं रिटर्न गिफ्ट, नेमकं काय घडलं तुम्हीच पाहा
- Viral Video : कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया' ची किली पॉलला भूरळ; हूक स्टेप केली कॉपी, पाहा व्हिडीओ
- Biggest White Diamond : जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या हिऱ्याची विक्री, किंमत माहित आहे का?
- Viral Video : 'या' चिमुकल्याचा स्वॅग पाहा, झोपाळ्यावर बसण्यासाठी लावली अनोखी शक्कल