Viral Video : चक्क चिमुकल्या मैनेनं केला ‘हरे कृष्णा’चा जप! व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल
Trending : आतापर्यंत आपण बोलणारे पोपट आपण अनेकदा पाहिलेच असतील. मात्र, बोलणारी मैना पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे.
![Viral Video : चक्क चिमुकल्या मैनेनं केला ‘हरे कृष्णा’चा जप! व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल Bird myna chanting Hare Krishna video goes viral on internet Viral Video : चक्क चिमुकल्या मैनेनं केला ‘हरे कृष्णा’चा जप! व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/19/8d41b46fa2e1ca7f68187e6835f007871660894200697373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Trending : आज सगळीकडे गोविंदांचा उत्साह पाहायला मिळतोय. कोरोना महामारीची लाट ओसरल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा पुन्हा एकदा दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळतोय. सगळीकडे लोक कृष्ण भक्तीत रममाण झालेले दिसत आहेत. देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करताना दिसत आहे. मात्र, या सगळ्यात चर्चा रंगलीये ती एका खास व्हिडीओची... या व्हिडीओत चक्क मैना ‘हरे कृष्णा’चा जप करताना दिसत आहे. या व्हिडीओला जगभरातील लोकांची (Viral Video) पसंती मिळत आहे.
आतापर्यंत आपण बोलणारे पोपट आपण अनेकदा पाहिलेच असतील. मात्र, बोलणारी मैना पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे. त्यातही या मैनेने ‘हरे कृष्णा’चा जप केल्याने ती आणखी चर्चेचा विषय ठरली आहे. मैनेने कृष्ण भक्तीत रममाण होत नेटकऱ्यांच मन जिंकून घेतलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ :
या अनोख्या व्हिडीओमध्ये एक मैना घरात फिरताना दिसत आहे. तर, मागून एका माणसाचा आवाज ऐकू येत आहे. हा माणूस मैनेला ‘हरे कृष्णा’ बोलायला सांगत असल्याचे ऐकू येते. सोबतच तो माणूस देखील ‘हरे कृष्णा’चा जप करू लागतो. तो व्यक्ती ‘हरे कृष्णा’ बोलताच ती चिमुकली मैना देखील तिच्या सुरात ‘हरे कृष्णा’ म्हणू लागते. अर्थात त्या व्यक्तीचे बोल ऐकून मैना देखील तिच्या भाषेत कृष्ण भक्तीत रममाण होते.
अहो आश्चर्यम्!
एखादा लहानगा पक्षी हुबेहूब बोलण्याचा प्रयत्न कसा करू शकतो, याचे सगळ्यांचं आश्चर्य वाटत आहे. मात्र या मैनेला पाहून सगळेच स्तब्ध झाले आहेत. कृष्ण भक्तीत तल्लीन झालेल्या या पक्ष्याला पाहून सगळेच ‘अहो आश्चर्यम्!’ म्हणून मैनेचे कौतुक करताना दिसत आहेत.
देशभरात कृष्णजन्माष्टमीची धूम!
भारतात कृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या थाटामाटात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. हिंदू धर्मात असे मानले जाते की, भाऊ कंसाच्या अत्याचारानंतर तुरुंगात असलेल्या बहीण देवकीने भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाला आपल्या आठव्या अपत्याच्या रूपात जन्म दिला. कंसाच्या अत्याचारापासून आणि दहशतीपासून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनीच हा अवतार घेतला होता. या पौराणिक कथेनुसार दरवर्षी भाद्रपदाच्या अष्टमीला कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून सगळ्या सणांवर कोरोनाच्या संसर्गामुळे बंदी घालण्यात आली होती. मात्र, यंदा हा जल्लोष पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)