Colours Marathi Serial Baipan Zindabad: 'बाईपण जिंदाबाद!'मधली पुढची कथा साध्या, सरळ 'अनुराधा'ची; स्त्रीप्रधान कथांपेक्षा काहीशी वेगळी
Colours Marathi Serial Baipan Zindabad: बाईपण… एक शब्द, पण त्यात किती अर्थ दडलेले असतात. एक स्वतंत्र जग त्यात सामावलेलं असतं. तिच्या मनात भावनांचे महासागर उसळत असतात, निर्णयांचं ओझं दडलेलं असतं.

Colours Marathi Serial Baipan Zindabad: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) 'बाईपण जिंदाबाद' (Baipan Zindabad) ही विशेष भागांची मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वात गोष्ट सादर करण्याचा हा नवा प्रयोग प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. बाईपण… एक शब्द, पण त्यात किती अर्थ दडलेले असतात. एक स्वतंत्र जग त्यात सामावलेलं असतं. तिच्या मनात भावनांचे महासागर उसळत असतात, निर्णयांचं ओझं दडलेलं असतं, आणि अनेक संघर्षांना ती शांतपणे सामोरी जात असते, मात्र हे जगाला दिसतच नाही.
काही वेळा थेट संबंध नसला तरी तिच्यावर आरोपांच्या फैरी झाडणं, व्यवस्थेचा बळी ठरवणं हे घडत राहतं. तिला मुळापासून उपटून टाकण्याचं, तिचं खच्चीकरण करण्याचे प्रयत्न होतच राहतात. पुरुषप्रधान संस्कृतीत बाईनं थोडं स्वतंत्र जगण्याचा प्रयत्न केला की, ती 'चुकीची' ठरते. तिच्या उंच भरारीला स्वप्नांचे पंख असले तरी ते कापण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही ती उठते… तुटलेल्या स्वप्नांच्या धुळीतून उभी राहते. मात्र त्यासाठी तिला चुकवावी लागणारी किंमत खूप मोठी असते. याला उत्तर आहे का? हाच शोध कलर्स मराठीच्या बाईपण जिंदाबाद मधील 'अनुराधा' या कथेत घेतला आहे. या स्त्रीची ही गोष्ट इतर स्त्रीप्रधान कथांपेक्षा वेगळी आहे.
'अनुराधा' कथा नेमकी काय?
अनुराधा साधी, सरळ, आत्मविश्वासू स्त्री. पण एका खोट्या आरोपाने तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. दोन वर्षांनी ती जेलमधून बाहेर पडली तरी समाजाने तिला ‘जन्मठेप’ सुनावलेली असते—भिंती बदलतात, पण चौकट तशीच राहते. नाती तुटतात, ओळख हरवते, आणि पायाखालची जमीन हलते.
View this post on Instagram
अशावेळी अनुराधा जे काही करते ते मुळापासून अनुभवण्यासारखे आहे. प्रत्येक अपमान, शंका, कुजबुज ओलांडत ती काय करते, ज्याने समाजाच्या व तुरुंगाच्या बेड्या कशा तुटतात- याची ही जगावेगळी गोष्ट. ही केवळ तुरुंगातून सुटण्याची नाही - तर त्या क्षणाची गोष्ट आहे, जिथे स्त्रीचे अस्तित्व पणाला लागते. तो क्षण प्रत्येक स्त्रीने जाणून घ्यावा, समजून घेऊन, समृद्ध व्हावा असा आहे - हा प्रवास अनुभवण्यासाठी अनुराधा येतेय आपल्या भेटीला.
अनुराधाच्या कथेतला वेदनेचा सूर खोल आहे. जेलमधून परत आलेली एक स्त्री आणि त्यातून उलगडत जाणारे स्त्रीत्वाचे प्रश्न बाईपणाचं वेगळं रूप समोर आणतात. हे प्रश्न खरं तर प्रत्येक स्त्रीने विचारण्यासारखे, आपल्या जगण्यात असले आहेत तरी अनुराधासारखे चॅलेंजिंग क्षण न आल्याने ते दिसत नाहीत.विचारले जात नाहीत..., अशा न बोलेल्या, न दिसणाऱ्या पण खोलवर असलेल्या प्रश्नांमधून ही कथा आकार घेते. कोर्टाने दिली 3 वर्षांची शिक्षा, पण समाजानं सुनावली 'जन्मठेप'. अनुराधा असं का म्हणते? हे अनुभवण्यासाठी ही कहाणी प्रत्येकानं पाहावी.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























