VIDEO : नदीत आढळलेला हा मासा म्हणजे 'जीवंत डायनासोर', 100 वर्षापर्यंत असू शकतं वय
Sturgeon Fish : कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया येथे एक दुर्मिळ मासा आढळला असून स्टर्जन असं या माशाचं नाव आहे. त्यालाच लिव्हींग डायनासोरही म्हणतात.
Sturgeon Fish Video : जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या मनुष्यांच्या विचारापलीकडे आहेत. त्यात विविध ठिकाणी आढळणाऱ्या विविध गोष्टी तसंच प्राणी यामुळेतर या सृष्टीत नेमक्या किती आणि कशा कशा गोष्टी आहेत. याचा अंदाज लावणंही अवघड आहे. त्यात कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामध्ये एका नदीत आढळलेला मासा सर्वांनाच चकीत करत आहे.
तर घटना आहे कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया (British Colambia) येथील फ्रेसर नदीतील. याठिकाणी यवेस बिस्सन (Yves Bisson) आणि एंगलर डॅन ललियर (Angler Dan Lallier) हे दोघे मासे पकडण्यासाठी गेले होते. दरम्यान अचानक त्यांना एक अत्यंत महाकाय मासा आढळला. तब्बल 270 किलो वजनाचा 11 फुट लांबीचा हा मासा म्हणजे स्टर्जन हा असून तो अत्यंत दुर्मिळ मासा आहे. विशेष म्हणजे या मास्याला लिव्हींग डायनासोर (Living Dinasour) असंही म्हणतात. या मास्याला पकडल्यानंतरचा त्याला लगेचच पाण्यात पुन्हा सोडण्यात आले. यावेळी या दोघांनी मास्याचा व्हीडीओ काढला असून हा व्हिडीओ Now This News या वृत्तसंस्थेने पोस्ट केला आहे. अनेकजण या व्हिडीओला शेअर करत आहेत.
100 वर्षे असू शकतं वय
या मास्याला पकडलं असता लगेचच त्याला पुन्हा पाण्यात सोडण्यात आलं. यावेळी बिस्सन यांने दिलेल्या माहितीनुसार तब्बल 250 ते 300 किलो वजन असणारा हा मासा 11 फुट लांब होता. हा मासा एक बराच काळ जगणारा मासा असल्याचं मासे तज्ज्ञांनी सांगितलं असून व्हिडीओतील माशाचं वय जवळपास 100 वर्षे इतकं असू शकतं. दरम्यान हा मासा डायनासोरच्या काळातील प्रजाती असल्यानं त्याला लिव्हींग डायनासोर म्हटलं जातं.
हे ही वाचा :
- Viral Video : म्हशींच्या कळपापुढे 'जंगलाचा राजा' हतबल, घाबरून झाडावर चढण्याची वेळ, व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्की हसाल
- Viral Video : मोराच्या अंड्याची चोरी करणं पडलं महाग, पुढे असं काही घडलं की...
- Trending Video : 'मैं झुकेगा नहीं'..नवजात बाळाचा ‘पुष्पा’ स्वॅग, चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले फॅन!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha