ABP Majha Top 10, 31 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Bengaluru : सिगारेटची अॅश फेकण्यासाठी गेला अन् 33 व्या मजल्यावरुन खाली कोसळला, 27 वर्षीय अभियंत्याचा मृत्यू
Bengaluru : सिगारेटची अॅश (cigarette ash) फेकण्यासाठी तो बाहेर आला आणि 33 व्या मजल्यावरून खाली कोसळला. यातच त्याचा दुर्दैवी अंत झालाय. ही घटना बंगळुरुतील पश्चिम भागात घडली आहे. दिव्यांशू शर्मा असे मृत्यू झालेल्या 27 वर्षीय अभियंत्याचे नाव आहे. Read More
Teacher Student Photos : विद्यार्थ्यासोबतच्या 'त्या' Viral रोमँटिक फोटोशूटवर शिक्षिकेचं उत्तर, म्हणाली, ''आमचं नातं...''
Headmistress Photoshoot With Student : शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिकेला फोटोशूटबद्दल विचारल्यावर शिक्षिकेने प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षिका आणि विद्यार्थ्याचं रोमँटिक फोटोशूट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. Read More
भारत आत्मविश्वासाने भरलेला, 2024 मध्येही तोच उत्साह आणि वेग ठेवायचाय - मोदी
आज भारताचा प्रत्येक कोपरा न कोपरा आत्मविश्वासाने भरलेला आहे. विकसित भारताच्या भावनेने-आत्मनिर्भरतेच्या भावनेने काठोकाठ भरलेला आहे. 2024 मध्येही आपल्याला तोच उत्साह आणि तोच वेग कायम ठेवायचा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते मन की बात कार्यक्रमात बोलत होते. Read More
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना राजकीय हादरे सुरुच; पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने उमेदवारी नाकारली
71 वर्षीय इम्रान खान एप्रिल 2022 मध्ये पंतप्रधानपदावरून हटल्यानंतर राजकीय आणि कायदेशीर लढाईत अडकले आहेत. खान यांच्यावर पंतप्रधान असताना सरकारी भेटवस्तूंची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप आहे. Read More
Kaun Banega Crorepati 15 : 'उद्यापासून हा मंच सजणार नाही', केबीसी 15 ला निरोप देताना अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर, शेअर केला भावनिक व्हिडिओ
Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती 15' एप्रिल 2023 मध्ये सुरू झाला आणि आता तो संपला आहे. 29 डिसेंबर रोजी KBC 15 च्या शेवटच्या एपिसोडमध्ये निरोप देताना अमिताभ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. Read More
Kareena Kapoor Khan : "जुने कलाकार जास्त मेहनती"; करीना कपूरने केलं तब्बू,राणी मुखर्जीचं तोंड भरून कौतुक
kareena kapoor Khan : आम्ही देखील मनोरंजन करण्याचे काम करतो. त्यामुळे अभिनय करताना वय वाढलं तरी कुठे फरक पडतो, असे बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) म्हणाली. एका मुलाखतीदरम्यान तिने राणी मुखर्जी आणि तब्बूचे तोंड भरुन कौतुक केले. Read More
KL Rahul : मी वर्ल्डकप खेळू शकेन असे वाटलंही नव्हतं; केएल राहुलने सांगितला आयुष्यातील कठिण प्रसंग
KL Rahul : शस्त्रक्रियेनंतर पहिले तीन-चार आठवडे मला चालताही आले नाही. वॉकरच्या साहाय्याने चालायला सुरुवात केली तेव्हाही मला वाटले की मी विश्वचषक खेळू शकणार नाही, असे केएल राहुल म्हणाला. Read More
Harbhajan Singh : भारताचा पैसा घेऊन भारतालाच वर्ल्डकपमध्ये हरवत आहेत; थेट हरभजन बोलला, सुरैश रैनालाही हसू आवरेना! नेमका प्रसंग घडला तरी काय?
Harbhajan Singh : IPL 2024 च्या माध्यमातून स्टार्क दीर्घ कालावधीनंतर स्पर्धेत परतणार आहे. तो 2015 मध्ये आयपीएलचा शेवटचा सामना खेळला होता. Read More
New Year Resolution नवीन वर्षात संकल्प करताय? 'या' टिप्सद्वारे बदलेल तुमचं आयुष्य, जाणून घ्या कसे?
New Year 2024 : नववर्षाच्या स्वागताला आता अवघे काही तासच शिल्लक आहेत. नववर्षाच्या सुरूवातीला अनेक जण नवनवीन संकल्प करतात. काम, आरोग्य, जिम यांसारख्या अनेक गोष्टींचा संकल्प केला जातो. Read More
आयकर भरण्यासाठी उरले काही तास, 31 डिसेंबरनंतर पुढे काय? किती होणार दंड?
2022-23 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम आजच (31 डिसेंबर) आहे. त्यामुळं ज्यांनी आयकर भरला नसेल त्यांना त्वरीत आयकर भरावा लागणार आहे. Read More