आयकर भरण्यासाठी उरले काही तास, 31 डिसेंबरनंतर पुढे काय? किती होणार दंड?
2022-23 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम आजच (31 डिसेंबर) आहे. त्यामुळं ज्यांनी आयकर भरला नसेल त्यांना त्वरीत आयकर भरावा लागणार आहे.
ITR Filing Deadline: 2023 हे वर्ष संपायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. काही तासातच नवीन वर्ष 2024 ला सुरुवात होणार आहे. दरम्यान, त्याआधी काही महत्वांच कामं करणं गरजेचं आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम आजच (31 डिसेंबर) आहे. त्यामुळं ज्यांनी आयकर भरला नसेल त्यांना त्वरीत आयकर भरावा लागणार आहे. आज आयकर न भरल्यास पुढे काय? किंवा किती दंड होऊ शकतो, याबाबतची माहिती पाहुयात.
तुम्ही विलंबित इन्कम टॅक्स रिटर्न्स (ITR) ची 31 डिसेंबरची अंतिम मुदत चुकवल्यास, तुम्हाला अपडेटेड ITR सबमिट करण्याचा पर्याय आहे. 2022 च्या वित्त कायद्याने हे अद्ययावत रिटर्न सादर करण्याचे सांगण्याच आले आहे. आयकर रिटर्न भरण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे, आयकर विभाग सुधारित आयटीआर दाखल करण्यासाठी शुल्क किंवा दंड आकारत नाही. ज्या व्यक्ती त्यांच्या उत्पन्नामध्ये समायोजन करत आहेत, परिणामी अतिरिक्त उत्पन्न घोषणा, अतिरिक्त करांच्या अधीन असू शकतात. चुका सुधारण्यात अयशस्वी झाल्यास थकित रकमेवर दंड आणि व्याज होऊ शकते.
आयकर विभागाने आयटीआर फॉर्म 1, 4 अधिसूचित केले
दरम्यान, आयकर विभागाने आयटीआर फॉर्म 1 आणि 4 साठी अधिसूचना जारी केल्या आहेत. ज्याचा वापर सामान्यत: वार्षिक एकूण उत्पन्न 50 लाखांपर्यंत असलेल्या व्यक्ती आणि संस्थांद्वारे मूल्यांकन वर्ष (AY) 2024-25 साठी केला जातो. साधारणपणे, विशिष्ट आर्थिक वर्षासाठी आयटीआर फॉर्म मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला जाहीर केले जातात. तथापि, यावर्षी, आयटीआर फॉर्म डिसेंबरच्या सुरुवातीला अधिसूचित केले गेले आहेत.
किती दंड भरावा लागणार?
विलंबित रिटर्न भरणाऱ्यांसाठी, आयकर विभागाच्या कलम 234F अंतर्गत 5,000 पर्यंतचा दंड लागू होऊ शकतो. तर 5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना 1,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. करदात्यांना अनावश्यक दंड टाळण्यासाठी आणि आयकर नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले जात आहे.
सरकारसाठी दिलासादायक बातमी
केंद्र सरकारसाठी (Central Govt) दिलासादायक बातमी मिळाली आहे. आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मूल्यांकन वर्ष 2023 ते 24 साठी आतापर्यंत 8 कोटीहून अधिक लोकांनी आयकर रिटर्न (ITR) भरला आहे. आयकर विभागाने ट्वीटरवद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. अर्थ मंत्रालयाने प्रथमच हा टप्पा गाठला आहे. अर्थ मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे यापूर्वी, करदात्यांनी मूल्यांकन वर्ष 2022-23 मध्ये एकूण 7,51, 60, 817 आयटीआर सादर केले होते. सरकारनं सभागृहात 2022-23 या आर्थिक वर्षाची माहिती देताना 7.40 कोटींहून अधिक लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरल्याचे म्हटले होते.
कोणत्या वर्षी किती लोकांनी भरला कर
लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले होते की, गेल्या पाच वर्षांत आयकर रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मंत्र्यांच्या उत्तरानुसार, 2018-19 मध्ये ITR फाइल करणाऱ्यांची संख्या 6.28 कोटींवरून 2019-20 मध्ये 6.47 कोटी आणि 2020-21 मध्ये 6.72 कोटी झाली. 2021-22 या आर्थिक वर्षात दाखल केलेल्या ITR ची संख्या 6.94 कोटींहून अधिक आणि 2022-23 मध्ये 7.40 कोटींहून अधिक झाली आहे. गेल्या चार वर्षांत, शून्य कर दायित्वासह आयटी रिटर्नची संख्या आर्थिक वर्ष 2019-20 मधील 2.90 कोटींवरून 2022-23 मध्ये 5.16 कोटी झाली आहे. भारत सरकारला नोव्हेंबर 2023 पर्यंत 17,45,583 कोटी रुपये मिळाले आहेत. यामध्ये 14,35,755 कोटी रुपयांचा कर महसूल (केंद्राला मिळणाऱ्या निव्वळ), 2,84,365 कोटी रुपयांचा गैर-कर महसूल आणि 25,463 कोटी रुपयांच्या कर्ज-विरहित भांडवली पावत्यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या: