Ulhasnagar : जन्मजात बाळाची 90 हजारांना विक्री, उल्हासनगरात आई-वडिलांचंच कृत्य, परिस्थितीचे कारण सांगितलं
Ulhasnagar Newborn Baby Sold : मुलाच्या आजीने या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर या प्रकरणी आई-वडील, मध्यस्त आणि बाळ खरेदी करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे : उल्हासनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई-वडिलांनी जन्मजात बाळाची 90 हजार रुपयांना विक्री करण्यात आली.,परिस्थिती हलाखीची असल्याचे कारण पुढे करत आई वडिलांनी ही विक्री परस्पर केल्याचं समोर आलं. या प्रकरणी आजीच्या तक्रारीवरून उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आई-वडील, मध्यस्थी महिला आणि खरेदी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर 4 च्या मराठा सेक्शन परिसरात विजया गायकवाड या महिला राहतात. त्यांना दोन मुलं असून त्यापैकी विशाल हा मोठा मुलगा आहे. विशालला 22 जानेवारी रोजी मध्यवर्ती रुग्णालयात मुलगी झाली अशी माहिती विशालने त्याच्या आईला दिली.
विशालची आई 25 जानेवारी रोजी बाळाला बघण्यासाठी रुग्णालयात आली असता बाळ 90 हजार रुपयांना विक्री झाल्याचं मुलाने सांगितले. पुन्हा ते बाळ मिळवावे यासाठी बाळाच्या आजीने प्रयत्न केले. घेतलेले पैसे पुन्हा परत करून बाळ आण असे तिने विशालला सांगितले.
आजीच्या तक्रारीवरून आरोपी अटकेत
दरम्यान, विशालने बाळ हे मध्यस्थी महिलेच्या प्रयत्नाने शेख कुटुंबीयांना विक्री केल्याचे सांगितले. अखेर विशालच्या आईच्या तक्रारीवरून उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आई, वडील, मध्यस्थी महिला आणि खरेदी करणाऱ्या शेख कुटुंबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चार महिलांसह दोन पुरुषांना ताब्यात घेऊन नोटीस बजावली. सध्या या आरोपींना सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास उल्हासनगर पोलीस करत आहेत.
ही बातमी वाचा: