![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Uddhav Thackeray At Thane : लांडगे विकले गेले, त्यांचा भाव काय हे सर्वांना माहिती, ठाण्यात जाऊन ठाकरेंचा शिंदेंवर पहिला हल्ला!
Uddhav Thackeray At Thane : येत्या काही दिवसात ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घेण्यासाठी मी येणार आहे. लवकरच ठाण्यात प्रचंड प्रचारसभा घेणार आहे," अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.
![Uddhav Thackeray At Thane : लांडगे विकले गेले, त्यांचा भाव काय हे सर्वांना माहिती, ठाण्यात जाऊन ठाकरेंचा शिंदेंवर पहिला हल्ला! Uddhav Thackeray At Thane Rally to be held in Thane soon announce Uddhav Thackeray Uddhav Thackeray At Thane : लांडगे विकले गेले, त्यांचा भाव काय हे सर्वांना माहिती, ठाण्यात जाऊन ठाकरेंचा शिंदेंवर पहिला हल्ला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/3ccab5c60aa36630191e367942990b57167472152659183_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Uddhav Thackeray At Thane : "सध्याचं राजकारण गलिच्छ झालंय. महाराष्ट्रातील बंडाळीमुळे देशभरात बदनामी झाली. लांडगे विकले गेले, त्यांचा भाव काय होता हे सर्वांना माहिती आहे. निष्ठावंत निखारे शिवसेनेसोबत (Shiv Sena) आहेत. उद्या याच निखाऱ्यांच्या मशाली होतील" असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाण्यात (Thane) जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर केला. ठाकरे गटाचे खासदार राजन विचार यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांचा पहिलाच ठाणे दौरा होता. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
उद्धव ठाकरे ठाणे दौऱ्यावर आल्यानंतर ठाकरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. दरम्यान, काही दिवसांआधी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ज्या जैन मंदिराला भेट दिली होती, त्याच जैन मंदिराला उद्धव ठाकरे आज भेट देणार आहेत.
लवकरच ठाण्यात जाहीर सभा घेणार
उद्धव ठाकरे म्हणाले, "मी इथे भाषण करायला उभा नाही, मात्र लवकरच भाषण करायला येणार आहे. आज नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आलो आहे. येत्या काही दिवसात ठाणेकरांच्या राजकीय आरोग्यासाठी मी इथे येणार आहे. सध्या राजकारणात विकृतपणा आणि गलिच्छपणा आलेला आहे. तो समोर दिसत असतानाही शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही याचा अभिमान आहे. अन्यायाला लाथ मारायची आहेच, पण 80 टक्के समाजसेवा आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आपण विसरलेलो नाही. राजन विचारे त्यांचे शिलेदार निष्ठावंत शिवसैनिक इथे आहेत. बाकी विकाऊ होते ते विकले गेले, त्यांचा भाव सांगण्याची गरज नाही."
50 खोके ही घोषणा काश्मीरपर्यंत
80 टक्के समाजसेवा आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनेची शिकवण आहे. अस्सल निष्ठावंत सैनिक इथे आहे. बाकी काय भावाने विकले गेले ते तुम्हाला माहित आहेत. 50 खोके ही घोषणा काश्मीरपर्यंत पोहोचली आहे. संजय राऊत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत गेले होते. तिथेही 50 खोके या घोषणा दिसत होत्या. नाही म्हटलं तरी महाराष्ट्राची बदनामी आहे.
जे गेले ते जाऊद्या. पण जे अस्सल शिवसैनिक शिवसेना आणि माझ्यासोबत राहिले. हे जे निखारे आहेत तेच उद्या मशाल पेटवणार आहेत.
मी मुख्यमंत्री असताना विचित्र जबाबदारी आली होती, जागतिक संकट आले होते, त्यावेळी तुम्ही जे सहकार्य केले विशेषतः डॉक्टरांनी ते मोठं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले
VIDEO : Uddhav Thackeray Full Speech : Thane : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)