एक्स्प्लोर

Thane Water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून चार दिवस पाणी पुरवठा झोनिंग पद्धतीने होणार

Thane Water Cut : ठाण्यात 21 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यान चार दिवस झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

Thane Water Cut : येते चार दिवस ठाणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने पाणी पुरवठा झोनिंग पद्धतीने होणार आहे. ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करणाऱ्या एका मुख्य अशुद्ध जलवाहिनीची वेगवेगळ्या सहा ठिकाणी गळती काढण्याचे काम 21 ते 24 फेब्रुवारी या काळात होणार आहे. या काळात शहराला स्वत:च्या योजनेतून 50 टक्केच पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे या काळात शहरात झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणजे प्रत्येक झोनमध्ये या चार दिवसात किमान 12 ते 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. या मुख्य दुरुस्ती सोबतच, साकेत पुलावरील मुख्य जलवाहिनीवर व्हॅक्यूम एअर व्हॉल्व बसविणे, पाणी पुरवठ्यातील दैनंदिन देखभाल दुरुस्तीची अत्यंत आवश्यक कामेही आदी विविध कामेही या चार दिवसात केली जाणार आहेत.

असं असणार आहे पाणी पुरवठ्याचे नियोजन

ठाणे महापालिकेने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन पुढील प्रमाणे केले आहे. 

मंगळवार, 21 फेब्रुवारी रोजी सकाळी  9 ते रात्री 9 या 12 तासात घोडबंदर रोड, बाळकुम, ब्रम्हांड, ढोकाळी, कोलशेत, मानपाडा, आझाद नगर, पातलीपाडा, वाघबीळ, विजय नगरी, कासारवडवली, ओवळा भाईंदरपाडा या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर, रात्री 9 ते सकाळी 9 या काळात, गांधीनगर, सुरकर पाडा, उन्नती, सिद्धांचल, जेल, साकेत, ऋतू पार्क, रुस्तमजी, कळवा, खारेगाव, आतकोणेश्वर नगर, रघुकूल आणि मुंब्रा येथील काही भाग यांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 

बुधवार, 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासात, सिद्धेश्वर, समतानगर, दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी या भागात पाणी पुरवठा बंद राहील. तर, रात्री 9 ते सकाळी 9 या काळात, गांधीनगर, सुरकर पाडा, उन्नती, सिद्धांचल, जेल, साकेत, ऋतू पार्क, रुस्तमजी, कळवा, खारेगाव, आतकोणेश्वर नगर, रघुकूल आणि मुंब्रा येथील काही भाग यांचा पाणी पुरवठा बंद राहील.

गुरूवार, 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सकाळी ९ या २४ तासात, इंदिरानगर, लोकमान्य नगर, किसननगर, श्रीनगर, शांतीनगर, रामनगर, रुपादेवीपाडा, सावरकर नगर, डवलेनगर, आंबेवाडी, परेरा नगर, झांजेनगर, साठे नगर, कैलासनगर, भटवाडी या भागात पाणी पुरवठा बंद राहील. तर, सकाळी 9 ते रात्री 9 या बारा तासांसाठी, सिद्धेश्वर, समतानगर, दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी या भागात पाणी पुरवठा बंद राहील. तसेच, रात्री 9 ते सकाळी 9 या बारा तासांसाठी, घोडबंदर रोड, माजिवडा, बाळकुम, ब्रम्हांड, ढोकाळी, कोलशेत, मानपाडा, आझाद नगर, पातलीपाडा, वाघबीळ, विजय नगरी, कासारवडवली, ओवळा भाईंदरपाडा या भागात पाणी पुरवठा बंद राहील.

शुक्रवारी, 24 फेब्रुवारी रोजी, सकाळी 9 ते रात्री 9 या काळात सिद्धेश्वर, समतानगर, दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी या भागात पाणी पुरवठा बंद राहील. तसेच, रात्री 9 ते सकाळी 9 या बारा तासांसाठी, घोडबंदर रोड, माजिवडा, बाळकुम, ब्रम्हांड, ढोकाळी, कोलशेत, मानपाडा, आझाद नगर, पातलीपाडा, वाघबीळ, विजय नगरी, कासारवडवली, ओवळा भाईंदरपाडा या भागात पाणी पुरवठा बंद राहील.

या शट डाऊनंतर पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत एक-दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP MajhaTOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
Embed widget