एक्स्प्लोर

Roshni Shinde: रोशनी शिंदे यांना पुढील उपचारासाठी लिलावती रुग्णालयात हलवलं, शिंदे गटाच्या महिलांनी केली होती मारहाण

Thane News: रोशनी शिंदे यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला आहे.  

ठाणे : सत्तांतरानंतर शिंदे आणि ठाकरेंच्या समर्थकांमधली धूसफूस ठाण्यातून वारंवार समोर येत होती. मात्र सोमवारी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला फेसबुक पोस्टवरुन मारहाण करण्यात आली.  शिंदेंच्या शिवसेनेतील महिला पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदेंना मारहाण केली. रोशनी शिंदे यांच्यावर  ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज रोशनी शिंदे यांना पुढील उपचारासाठी लिलावती रुग्णालयात (Roshni Shinde Shifted to Lilavati Hospital) हलवण्यात आले आहे.  

उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार शरसंधान साधलं ज्यावरुन राजकारण पेटलंय. रोशनी शिंदे यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला आहे.  काल समोर आलेल्या रिपोर्टनुसार रोशनी शिंदे यांना कोणतीही गंभीर दुखापत नाही असंच नमूद करण्यात आलंय  तसंच त्या गर्भवती नसल्याचंही सांगण्यात आलंय 

ठाकरे कुटुंबियांनी घेतली रोशनी यांची भेट

ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी आणि आदित्य ठाकरे भेट घेतली. रोशनी शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथं जाऊन ठाकरे कुटुंबियांनी त्यांची विचारपूस केली. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली भागात रोशनी शिंदे यांचं कार्यालय आहे. तिथून सोमवारी संध्याकाळी घरी निघत असताना शिंदे गटाच्या 15 ते 20 महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचा आज मोर्चा

ठाण्यात आज ठाकरे गट मोठा मोर्चा काढणार आहे.. रोशनी शिंदे प्रकरणात पोलिसांनी पक्षपातीपणा केला असा आरोप ठाकरे गटानं केला आहे. आणि त्याचा निषेध म्हणून शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता मोर्चाला सुरुवात होईल. आदित्य ठाकरे, विनायक राऊत, जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत चव्हाण मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.पोलिसांनी रोशनी शिंदे यांच्या तक्रारीनंतरही कारवाई केली नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

काय आहे प्रकरण?

ठाण्यातील कासारवडवली परिसरात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत मारहाण केली होती. या मारहाणीनंतर रोशनी शिंदे यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची लेखी तक्रार देखील दाखल केली होती. या अर्जाद्वारे केलेल्या तक्रारीची चौकशी सुरू असून चौकशी अंती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होणार असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी सांगितले. मात्र त्यानंतर रोशनी शिंदे यांच्याच अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. सोमवार 4 एप्रिल रोजी संध्याकाळी रोशनी शिंदे यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.  पहिला गुन्हा कासारवडवली पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांच्या तक्रारीवरून आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी दाखल करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे रोशनी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी भाजप पदाधिकारी संजय वाघोले यांनी देखील गुन्हा दाखल केला आहे. वाघोले यांच्या तक्रारीनंतर कलम 153 अ-1, कलम 499, कलम 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Thane Metro : मुंबई मेट्रोचं झालं, पण ठाणेकरांच्या मेट्रोचं स्वप्न अजूनही अपूर्ण, दहा वर्षांपासून काम रखडलं
मुंबई मेट्रोचं झालं, पण ठाणेकरांच्या मेट्रोचं स्वप्न अजूनही अपूर्ण, दहा वर्षांपासून काम रखडलं
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
Thane-Borivali Twin Tunnel Project: नॅशनल पार्कच्या खालून तीन लेन रस्ता; 90 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत होणार; कसा आहे ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प?
नॅशनल पार्कच्या खालून तीन लेन रस्ता; 90 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत होणार; कसा आहे ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प?
Devendra Fadnavis and Pratap Sarnaik: मिरा-भाईंदरच्या 30 टक्के जमिनी नरेंद्र मेहतांच्या, मला 10 टक्के द्यायला तयार, सरनाईकांच्या वाक्यावर फडणवीस म्हणाले, 'सगळं रेकॉर्ड होतंय बरं का'
मिरा-भाईंदरच्या 30 टक्के जमिनी नरेंद्र मेहतांच्या, मला 10 टक्के द्यायला तयार, सरनाईकांच्या वाक्यावर फडणवीस म्हणाले, 'सगळं रेकॉर्ड होतंय बरं का'

व्हिडीओ

Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
Sanju Samson : संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, नवा कोरा मोबाइल गिफ्ट दिला
संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, कारमधून नवा कोरा मोबाइल काढला अन् गिफ्ट दिला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 एप्रिल 2026 | गुरुवार
सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत गोपीचंद पडळकर; भाजपकडून 40 नेत्यांची यादी आयोगाकडे सादर
सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत गोपीचंद पडळकर; भाजपकडून 40 नेत्यांची यादी आयोगाकडे सादर
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
Baramati Byelection: बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
Byelection: राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
Satara ZP Election : राष्ट्रवादी ऐवजी भाजपच्या उमेदवाराला मतदान, पक्षाचा व्हिप मोडला, राष्ट्रवादी काँग्रेसकडून लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळेंविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु
लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळे अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपात्रतेची कारवाई सुरु
Embed widget