एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

बदलापूरमध्ये रिक्षा चालकांचा बेमुदत संप सुरूच, प्रशासनाचे दुर्लक्ष, प्रवाशांना त्रास

तीन दिवस उलटूनही सरकारी अधिकाऱ्यांनी या उपोषणाची दखल घेतली नाही. रिक्षा स्टँडच्या मागणीसाठी साखळी उपोषणही सुरू करण्यात आलं आहे. 

ठाणे: बदलापूर शहरातील सर्व रिक्षा चालकांनी बेमुदत संप पुकारला असून आज सलग तिसऱ्या दिवशीही हा संप सुरूच आहे. सोबतच रिक्षा स्टॅन्डच्या मागणीसाठी रिक्षा चालकांनी साखळी उपोषणालासुद्धा सुरुवात केली आहे. त्यामुळे बदलापूर शहरातील रिक्षा सेवा मात्र पूर्णपणे ठप्प झाली असून याचा प्रवाशांना त्रास होतोय.

बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रिक्षा स्टॅन्ड शुक्रवारी बदलापूर पालिकेने कारवाई करत जमीनदोस्त केलं. रेल्वेच्या होम प्लॅटफॉर्मसाठी आणि पादचारी पुलासाठी ही जागा लागणार असल्यानं हे रिक्षा स्टॅन्ड तोडण्यात आलं. वास्तविक हे रिक्षा स्टॅन्ड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला स्थलांतरित करून मग तोडण्यात येणार होतं. त्यासाठी स्वतः बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी रिक्षा चालकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्थलांतराला सहमती दर्शवली होती. 

पर्यायी जागा देण्यापूर्वीच पालिकेने अनधिकृत गाळ्यांवर केलेल्या कारवाईसोबत रिक्षा स्टॅन्डवर सुद्धा कारवाई केली. त्यामुळे संतापलेल्या रिक्षाचालकांनी बेमुदत संप पुकारला. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या संपाचा आजचा तिसरा दिवस असून यासोबतच रिक्षाचालकांनी साखळी उपोषण सुद्धा सुरू केलं आहे. रिक्षा चालकांच्या या बंदमध्ये बदलापूर शहरातील तब्बल चार हजार रिक्षाचालक सहभागी झाले आहेत. यामध्ये बदलापूर पश्चिमेकडील 45, तर बदलापूर पूर्वेकडील 30 स्टॅन्डवरील रिक्षा चालकांचा समावेश आहे.

बारवी डॅम आणि मुरबाडकडे जाणाऱ्या काळ्यापिवळ्या टॅक्सीचालकांनी सुद्धा या बंदमध्ये सहभाग घेतला असून त्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या जवळपास 50 टॅक्सी सुद्धा बंद आहेत. परिणामी बदलापूर शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागात जाणारी रिक्षा आणि टॅक्सी सेवा संपूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा साहजिकच प्रवाशांना मात्र मनस्ताप सोसावा लागतोय. मात्र असं असूनही गेल्या तीन दिवसात नगरपालिकेचा एक अधिकारीही फिरकला नसल्याची खंत रिक्षा चालकांनी व्यक्त केली आहे.

साखळी उपोषणा सोबतच बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा चालकांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. बदलापूर शहर हे सध्याच्या घडीला बदलापूर गाव, सोनीवली, वडवली, साई वालीवली, माणकिवली, जुवेली, खरवई या गावाबाहेरच्या ग्रामीण पट्ट्यातही विस्तारत असून हे अंतर स्टेशन पासून किमान 5 ते 6 किलोमीटर इतकं आहे. त्यामुळे या भागातल्या प्रवाशांना स्टेशनला ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे बदलापूर पालिकेने लवकरात लवकर रिक्षा चालकांशी बोलून त्यांच्या संपावर तोडगा काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Embed widget