एक्स्प्लोर

Kalyan : कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपकडे असावा ही कार्यकर्त्यांची मागणी, चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदे गटाची धाकधूक वाढली

Thane Kalyan Loksabha Election : कल्याण लोकसभेसाठी भाजपचे कार्यकर्ते आग्रही असून त्यांनी हा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा अशी मागणी केली आहे.

ठाणे : कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघ (Kalyan Loksabha Election) हा भाजपला मिळावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे हे खरं, पण त्याबाबतचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेणार असल्याचं महत्त्वपूर्ण वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलंय. हा मतदारसंघ कोणत्याही पक्षाकडे गेला तरी ही जागा निवडून आणण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील असंही ते म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची महाविजय 2024 संकल्प दौरा आज डोंबिवलीत सुरू आहे. यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ भाजपकडे ठेवावा अशी मागणी केली. कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप कार्यकर्त्यांनी देखील दावा केलाय. याबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला ठेवावा अशी मागणी केली हे खरं आहे हे असे सांगितले. 

जागावाटपाचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेणार

भाजप कार्यकर्त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा असं वाटतं, मात्र अनेक ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देखील मतदारसंघ त्यांना मिळावा असं वाटतं. जागावाटपाचा निर्णय  घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या समन्वयाने केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला आहेत. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो मान्य असेल. सध्या ही जागा शिवसेनेकडे आहे. ही जागा शिवसेनेकडे गेली तर  51 टक्के मतांनी खासदार निवडून यावा  याकरता भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने तयारी करेल.

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हीच आमची भूमिका

मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी मंत्रालयात उपसमितीची बैठक आहे. याबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षणासाठी सर्व पक्षाचा पाठिंबा आहे, भाजपचा  देखील पाठिंबा आहे असं सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आश्वस्त केलंय. आम्ही सर्व एकनाथ शिंदे यांच्या मागे आहोत, मराठा समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे हीच आमची भूमिका आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे योग्य निर्णय घेतील असही ते म्हणाले.

धर्मेंद्र प्रधान यांच्या त्या वक्तव्याचा आधी भाव बघितला पाहिजे 

भाजपचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'समर्थ रामदास नहीं होते तो शिवाजी नहीं बनते' असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडकडून निषेध नोंदवण्यात येत आहे. याबाबत बोलताना बावनकुळे यांनी वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत असल्याचं सांगितलं. त्यामुळे त्यांचा त्यामागचा भाव बघितला पाहिजे, त्या मागचा भाव बघितला तर कळेल असं सांगत प्रश्नाला बगल दिली.

आदित्य ठाकरे यांनी साडेआठ हजारांची विकासकामे खोक्यांसाठी थांबवली असा आरोप केला आहे. याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, यांनी सरकारमध्ये असताना ते काम करू शकले नाहीत ते काम आमच्या सरकारने सुरू केले. म्हणून पोटात दुखतेय. त्यांना काही ना काही दिवसभर बोलावं लागतं, मीडियात आपलं अस्तित्व ठेवावं लागते. त्यामुळे काही ना काही असे वक्तव्य सुरू आहेत. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्यSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
Embed widget