एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भिवंडीत एकाच दिवसात तीन दुर्देवी घटना, दोन जणांचा मृत्यू

भिवंडीमध्ये एका दिवसात केमिकल ड्रम स्फोट ,ऑईल गोदामात आग तर केमिकलचा टँकर उलटला.. या घटनेत दोघांचा मृत्यू झालाय. 

Bhiwandi : भिवंडीकरांची आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती भीषण आगीने.  शहरातील खोका कंपाउंड परिसरात एका ऑइल गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. तर रस्त्याच्या दुभाजकाला केमिकल टँकर जोरदार आदळल्याने ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर रस्त्या किनारी असलेल्या वाहनांना तुडवत पलटी झाला. तर दुसरीकडे एका अवैध भंगार गोदामात केमिकलचा वापर करून पिशव्या धुतले जात होते, मात्र बिडी ओढण्याचा नशेमुळे केमिकल ड्रमचा मोठा स्फोट झाला. यामध्ये भंगार मालकासह कामगार असे दोघांचे जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

पहाटेच्या सुमारास भिवंडी शहरातील खोका कंपाउंड परिसरात एका ऑइल गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली, ही आग इतकी भीषण होती की परिसरात आगीचे लोळ व धूर मोठ्या प्रमाणात पसरले होते. तात्काळ वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आली व या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी  दाखल झाल्या.  या आगीवर तब्बल चार तासानंतर  अग्निशमन दलाच्या जवानांनी यश मिळवले. मात्र या आगीचे कारण अजूनही अस्पष्ट असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. 

दिवस उजाडलाचा होता की भिवंडी शहरातील नदी नाका परिसरात एपीजे अब्दुल कलाम उड्डान पुलावरून खाली उतरताना मुंबईहून वाड्याच्या दिशेने जात असताना ज्वलन सिल केमिकलने भरलेला टँकर दुभाजकाला आदळून पलटी झाला. यादरम्यान रस्त्या किनारी उभं असलेल्या पाच ते सहा दुचाकी व एका रिक्षाला टँकरची धडक लागल्याने वाहनांचे नुकसान झाले. शिवाय टँकरमधून ज्वलनशील केमिकलची गळती सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.  हा केमिकल इतका भीषण होता की दुचाकी वरील कलर अक्षरशः जळून निघाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस देखील दाखल झाले. सध्या हा केमिकल कोणता आहे याचे अनुमान लावले जात आहे, परंतु हा केमिकल अतिशय ज्वलनशील असल्याचे निदर्शनात येत आहे. गळती सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील पसरले आहे. या ठिकाणी घडलेली ही पहिली घटना नाही, याआधी देखील अनेक टँकर आणि कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये अजूनपर्यंत तर कोणतीही जीवित हानी झाली नाही.  

केमिकल ड्रमचा भीषण स्फोट झाल्याची घटना भिवंडी शहरालगत असलेल्या कांबा ग्रामपंचायत हद्दीतील तळवळी नाका भागातील  घरत कंपाउंड मधील भंगार गोदामात घडली. उघड्यावर असलेल्या भंगार  गोदामात केमिकलचा वापर करून पिशव्या धुण्याचे काम आज सकळाच्या सुमारास दोघे मृतक करीत  होते. त्यातच एका कामगाराला बिडी ओढण्याची तलप लागल्याने त्याने बिडी पेटवत बिडी पिण्यास सुरुवात केली. मात्र बिडीची ठिणगी केमीकल ड्रमच्या संपर्कात आल्याने केमीकल  ड्रामचा मोठा स्फोट झाला. केमिकल ड्रमचा स्फोटात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली, या दुर्घटनेत रमजान कुरेशी (वय 46) भंगार मालक व ईशराईल शेख (वय 35) कामगार असे जागीच ठार झाल्याची  नावे आहेत. स्फोट  इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतींचे खिडकीचे काचादेखील फुटल्या आहेत. स्फोट इतका भीषण होता की दोन्ही कामगारांचा मृतदेह 50 ते 60 फूट हवेत उडून दूरवर फेकले गेले होते.  भंगार गोदामाला देखील आग लागली होती, या आगीवर  भिवंडी अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले असून घटनास्थळी भिवंडी निजामपूर पोलिस दाखल असून पोलीस पंचनामा करीत आहेत. तर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करता स्वर्गीय इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
S. Jaishankar and Kyoko Somekawa Love Story : जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PuneKar on Next CM | पुणेकरांना मुख्यमंत्री कोण हवाय? वाफळता चहा; राजकारणावर गरमागरम चर्चाPunekar on CM Maharashtra  : मुख्यमंत्री कोण हवा, पुणेकरांचं मत काय...Ahilyanagar Cold Wave | नगरकर गारठले, निचांकी तापमानाची नोंद; जागोजागी शेकोट्या पेटल्याABP Majha Headlines :  10 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
S. Jaishankar and Kyoko Somekawa Love Story : जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Embed widget