एक्स्प्लोर

कोकणवासियांच्या आरक्षित तिकिटांवर डल्ला कोण मारतंय? राजू पाटलांचा परखड सवाल, राज्य रेल्वेमंत्री दानवेंना पत्र

Raju Patil Write Letter to Raosaheb Danve : कोकण रेल्वे तिकीट बुकिंग प्रकरणी आमदार राजू पाटलांचं रावसाहेब दानवेंना पत्र.. दलाल दिसल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवा, कार्यकर्त्यांना आवाहन

Raju Patil Write Letter to Raosaheb Danve : रेल्वे तिकीट बुकिंग (Railway Ticket Booking) व्यवस्था दलालांसंदर्भात मनसे (MNS) आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister of State for Railways Raosaheb Danve) यांना पत्र पाठवलं आहे. रेल्वे तिकीट बुकिंग व्यवस्थेतील दलालांवर अंकुश ठेवण्याची विनंती राजू पाटील (Raju Patil) यांनी पत्राद्वारे केली आहे. सोबतच रेल्वे स्टेशनवर दलाल दिसून आले तर मनसे स्टाईलनं त्यांना धडा शिकवा, असं आवाहनही राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्र लिहून रेल्वे तिकीट बुकिंग व्यवस्थेतील दलालांवर अंकुश ठेवण्याची विनंती केली आहे. त्यांनी पत्रात म्हटलं आहे की, "गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीच 17 सप्टेंबर चे रेल्वेचे आरक्षण शुक्रवारी अवघ्या काही मिनिटांतच फुल्ल झाले आहे. कोकण रेल्वे व कोल्हापूरपर्यंत जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये आता या दिवसाचे एकही आरक्षित तिकीट शिल्लक उरलेले नाही. त्यामुळे या आरक्षित तिकिटांवर नेमके डल्ला कोण मारत आहे, याचा आढावा घ्या."

"दलालांच्या हातात आज सर्व आरक्षण असून परराज्यातून सर्रास तिकीट बुक होतात, असं असतानाही मंत्रालयाला कोणतंही गांभीर्य नाही आणि याची कधी चौकशी देखील होत नसल्यानं दलालांना संधी मिळत आहे. सर्व रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाचा आढावा घेऊन नवीन गाड्यांचे नियोजन आताच करून गौरी गणपती निमित्त जाणाऱ्या सर्व भाविकांना आरक्षण मिळवून कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रयत्न करा" अशी विनंतीही त्यांनी पत्रातून केली आहे. 

रेल्वे तिकीट दलालांचा सुळसुळाट; 'एबीपी माझाचा इम्पॅक्ट'

रेल्वे तिकीट बुकिंग व्यवस्था दलालांच्या हाती गेल्याची बातमी 'एबीपी माझा'नं दाखवल्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्रव्यवहार करून दलालांवर अंकुश ठेवण्याची विनंती केली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. रेल्वे स्टेशनवर दलाल दिसून आले तर मनसे स्टाईलनं त्यांना धडा शिकवा, असं थेट कार्यकर्त्यांनी राजू पाटील यांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, मुंबई आणि परिसरातील उपनगरांतील गणेशभक्त वर्षानुवर्षे गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी तिकीट बुक करत असतात, मात्र त्यांना या दलालांमुळे तिकीट बुक होत नसल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. हीच बातमी मनसे आमदार राजू पाटील यांनी पाहिल्यानंतर रेल्वेमंत्र्यांना पत्र धाडलं. दलालांचा सुळसुटा थांबवण्यासाठी मनसे स्टाईल वापरण्याचं आवाहनही आमदार राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget