एक्स्प्लोर

त्याला आम्ही धडा शिकवणार, मारहाण झालेल्या तरुणीची भेट घेत मनसेचा इशारा; उपचाराची घेतली जबाबदारी

कल्याण पूर्वमधील खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या तरुणीवर एका गुंड प्रवृत्तीच्याा तरुणाकडून झालेल्या हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

ठाणे : कल्याणमधील (Kalyan) रुग्णालयात कामावर असलेल्या रिसेप्शनीस्ट तरुणीला झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपी गोकूळ झा गुंड प्रवृत्तीचा तरुण आहे. फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करतो, हेच त्याचे काम असल्याची धक्कादायक माहिती शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी दिली. तर, पीडित मुलींच्या उपचाराच्या खर्चाची जबाबदारी मनसेने घेतली आहे. उपचारासाठी पीडित मुलीला मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले असून घटना घडून 22 तास उलटून गेले तरी आरोपी गोकुळ झा पोलिसांना सापडला नाही, तो अद्यापही फरार आहे. त्यामुळे, मनसेच्यावतीने (mns) पोलिसांनाही इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तासात आरोपी न सापडल्यास आम्ही पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन करू, असे अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.  

कल्याण पूर्वमधील खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या तरुणीवर एका गुंड प्रवृत्तीच्याा तरुणाकडून झालेल्या हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली आणि पीडित तरुणीच्या घरी जाऊन तिची भेट घेत उपचाराच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी उचलण्याचे आश्वासनही दिले. "त्या मुलीची शारीरिक अवस्था पाहून संताप अनावर होतो. छाती, पाठ, पायावर मारहाण झाली असून तिला तातडीने रुग्णालयात भरती करणं गरजेचं आहे. तिची स्थिती गंभीर असून ती कालपासून तशीच आहे, कपडेही बदललेले नाहीत.", असे अविनाश जाधव यांनी म्हटले. 

पोलिसांच्या कारवाईवरही जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे. "घटना घडून २२ तास उलटून गेले तरी आरोपी गोकुळ झा फरार आहे. आमच्या कार्यकर्त्यांना रात्रीच्या वेळी उचलता, मग अशा गुन्हेगाराला का नाही?",असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच, हा प्रकार मराठी-अमराठी वाद नसला तरीही  “जर बाहेरून आलेला व्यक्ती आमच्या मराठी मुलीला अशा पद्धतीने मारत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही,” असा थेट इशारा अविनाथ जाधव यांनी दिला. “जर लवकरात लवकर आरोपीला अटक झाली नाही, तर आम्ही पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन छेडू,” असा स्पष्ट इशारा मनसेने दिला आहे. दरम्यान, “मतासाठी काही नेते बाहेरून माणसं आणून बसवतात आणि त्यांना वाटतं, काहीही केलं तरी सगळं माफ'', असे म्हणत राजकीय नेत्यांवरही जाधव यांनी टीका केली आहे. 

शालिनी ठाकरेंचा गृहखात्यावर निशाणा

कल्याणमधल्या मुलीला मारहाण होऊन 24 तास उलटले आहेत. राज्याचं गृहखातं इतकं कमजोर आहे का? की एका तिरपट गुंडाला 24 तासांत शोधू शकत नाही? महाराष्ट्रातल्या आया-बहिणींवर हात उचलले जात असतील, आणि गुन्हेगार मोकाट फिरणार असेल तर राज्याची सुरक्षा रामभरोसे आहे म्हणावं लागेल. कल्याणच्या मुलीला न्याय मिळायलाच हवा, त्या नराधमाला लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे आणि कडक शिक्षा देखील व्हायला पाहिजे, असे ट्विट मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी केलं आहे. 

रुग्ण मुलीवर गरजेचे उपचार केले

रुग्णाला जास्त मारहाण झाली असून तिच्या हाता-पायाला दुखापत झाल्याने तिला नीट हालचाल करता येत नाही. आपण पेशंटचं एक्स रे केलं आहे, पुढे एमआरआय करण्याची गरज भासल्यास करू, सध्या गरजेचे उपचार तिच्यावर केल्याची माहिती ग्लोबलमधील डॉ. ऋतुजा जानकी यांनी दिली. 

हेही वाचा

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाइन एक खिडकी प्रणाली सुरू; गणेशभक्तांना असा करावा लागेल अर्ज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Pune News: वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
Nashik Election Shivsena And MNS: मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
मनसे 50, ठाकरे गट 72 जागांवर लढणार; राज-उद्धव युतीनंतर नाशिक महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
Embed widget