एक्स्प्लोर

Ketaki Chitale : केतकीला जामीन मिळूनही तुरुंगवास कायम, दुसरीकडे केंद्रीय महिला आयोगाची पोलीस महासंचालकांना नोटीस

Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे हिने नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केल्यानंतर आता तिला जामीन मिळाला असला तरी तिची तुरुंगातून सुटका अजूनही झालेली नाही.

Ketaki Chitale Case : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दलच्या वादग्रस्त पोस्टनंतर अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) अडचणीत सापडली आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्यावरील इतर गुन्ह्यांचा तपासही सुरु आहे. आता नुकत्याच समोर आलेल्या अपडेटनुसार केतकीला अॅट्रोसिटी काद्यान्वे जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 हजार रुपयांच्या दंडानंतर तिला जामीन मंजूर ढाला असला तरी तुरुंगातून मात्र तिची सुटका अद्याप झालेली नाही. कारण एका दुसऱ्या केसची सुनावणी केतकीविरुद्ध सुरु असून ही सुनावणी 21 जून रोजी होणार असल्याने ती अद्यापही जेलमध्येच राहणार आहे. दुसरीकडे केंद्रीय महिला आयोगानेही या प्रकरणात उडी घेत पोलीस महासंचालक रजनीस सेठ यांना नोटीस पाठवली आहे.

अभिनेत्री केतकीने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. ज्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करुन तिला तुरुंगात देखील टाकण्यात आलं आहे. या प्रकरणात सतत नवनवीन अपडेट समोर येत असून नुकतच केतकीने मुंबई उच्च न्यायालयात तिला झालेली अटक बेकायदेशीर असल्याची याचिका दाखल केली. ज्यानंतर आता केंद्रीय महिला आयोगाने देखील तिच्या बाजूने येत पोलीस महासंचालक रजनीस सेठ यांना नोटीस पाठवली आहे.

नेमकं प्रकरण काय?

अभिनेत्री केतकी चितळेनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवरून तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. केतकी चितळेनं ही पोस्ट करुन समाजात द्वेषाची भावना आणि तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं असून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनंच केली आहे, असे म्हणत कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात कलम 505(2), 500, 501, 153 (अ) नुसार गुन्हा दाखल केला गेला होता. याप्रकरणी प्राथमिक पोलीस कोठडीनंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, ती सध्या कारागृहात आहे. कळवा पोलीस ठाण्यातील हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत केतकीनं आता उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दाखल केल्याचा दावाही केतकीनं आपल्या याचिकेतून केला असून याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Ketaki Chitale : ‘ठाणे पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर!’, अभिनेत्री केतकी चितळेने ठोठावले मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे

कोणाचेही मूलभूत अधिकार अमर्याद नाही, शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला दिलासा देण्यास कोर्टाचा नकार

Ketaki Chitale : केतकी चितळेचा तुरूंगातील मुक्काम वाढला, ठाणे सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

 

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Adivasi Students Ulgulan Morcha: आदिवासी विद्यार्थ्यांचा ‘उलगुलान’ मोर्चा ठाण्यात अडवला; पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचा दावा, धक्काबुक्कीचाही आरोप
आदिवासी विद्यार्थ्यांचा ‘उलगुलान’ मोर्चा ठाण्यात अडवला; पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचा दावा, धक्काबुक्कीचाही आरोप
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील चक्रावणारी थिअरी, गोळी रिव्हर्स होऊन टल्ली कनोजियाला लागली? संशय येताच पोलिसांच्या वेगवान हालचाली
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील चक्रावणारी थिअरी, गोळी रिव्हर्स होऊन टल्ली कनोजियाला लागली? संशय येताच पोलिसांच्या वेगवान हालचाली
Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: एक तरुणी दोन मुलांसोबत खोलीत आढळली अन्...; प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
एक तरुणी दोन मुलांसोबत खोलीत आढळली अन्...; प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget