Kalyan : विद्यार्थ्यांनी टिळा-टिकली लावू नये, हातात धागा अथवा बांगड्या घातल्यास शिक्षा; कल्याणमधील शाळेचा अजब फतवा
Kalyan School Controversy : विद्यार्थ्यांनी हातात कोणताही धागा बांधू नये, विद्यार्थिनींनी बांगड्या घालू नये असा नियम शाळेने केला आहे. त्याचे पालन करावे अन्यथा शिक्षा दिली जाईल असं शाळेने म्हटलं आहे.

ठाणे : कल्याणमधील प्रसिद्ध के. सी.गांधी इंग्लिश स्कूलमध्ये (SMT K. C. Gandhi English School Kalyan) विद्यार्थ्यांनी कपाळावर टिळा किंवा टिकली लावणे, विद्यार्थिनींनी हातात बांगड्या घालणे तसेच विद्यार्थ्यांनी राखी अथवा धागा बांधणे यावर बंदी घालण्यात आली आहे. शाळा प्रशासनाच्या या निर्णयामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं चित्र आहे. या प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळा प्रशासनाकडे खुलासा मागितला आहे.
Kalyan School Controversy : टिळा लावल्यास शिक्षा
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी जर शाळेत टिळा किंवा टिकली लावून आले तर त्यांचा टिळा जबरदस्तीने पुसला जात आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांना मारहाणही करण्यात आल्याचा दावा पालकांनी केला. विद्यार्थ्यांनी जर टिळा लावून शाळेत आल्यास त्यांना शिक्षा केली जाईल, अशी धमकीही दिली गेल्याचा पालकांचा दावा आहे.
या प्रकरणावर संतप्त पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. त्यावर सर्व विद्यार्थ्यांना टिळा, टिकली, गंध, बांगड्या आणि राखी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती मुख्याध्यापकांनी दिली.
महापालिकेची नोटीस, खुलासा करण्याचे आदेश
या निर्णयाविरोधात पालकांनी ठाकरे गटाचे कल्याण विधानसभा संघटक रुपेश भोईर यांच्याकडे तक्रार केली आहे. रुपेश भोईर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाकडे तक्रार केली.
कल्याण डोंबिवली मनपा शिक्षण विभागाने या घटनेची तातडीने दखल घेत शाळेला नोटीस पाठवून तातडीने खुलासा मागितला आहे.
ही बातमी वाचा:
























